Breaking News
  • पुण्याहून मुंबईला येणारी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल
  • रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट, नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ
  • आळंदीमध्ये इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय, चारही पूल गेले पाण्याखाली
  • मुंबई, पुणे परिसरात पुढील 2 दिवस रेड अलर्ट
  • मुंबईतील सकाळची विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवासात अडचणी
  • कोकण रेल्वे मार्गावर ट्रेन विलंबाने; मुसळधार पावसाचा फटका
  • मावळमध्ये एनडीआरएफची धाडसी कारवाई; पाण्यात अडकलेल्या बसमधील ३७ प्रवाशांची सुखरूप सुटका
  • साताऱ्यात सुसाट्याच्या वाऱ्याने शाळेचे छप्पर उडाले
  • पुणे मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

मलकापूर पालिका प्रशासन

मलकापूर पालिकेच्या कारभारावर ‘प्रहार’; मुख्याधिकार्‍यांच्या खुर्चीला ‘बेशरम’चे झाड भेट!

Malkapur Municipal Administration: शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था, ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे, नगर परिषद प्रशासनाकडून होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, संतप्त प्रहार संघटना


मलकापूर पालिकेच्या कारभारावर ‘प्रहार’ मुख्याधिकार्‍यांच्या खुर्चीला ‘बेशरम’चे झाड भेट

Malkapur Municipal |

 

​प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात अजय टप यांचे अनोखे आंदोलन; खड्डे न बुजविल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा

मलकापूर (Malkapur Municipal Administration) : शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था, ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे आणि या गंभीर समस्येकडे नगर परिषद प्रशासनाकडून होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती संघटनेने आज, ६ जुलै रोजी नगर परिषद प्रशासनाविरोधात एक अनोखे आणि तीव्र आंदोलन केले. प्रहारचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी थेट (Malkapur Municipal) नगर परिषद मुख्याधिकार्‍यांच्या दालनात जात, त्यांच्या रिकाम्या खुर्चीला ‘बेशरम’चे झाड देऊन प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा जाहीर निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे पालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

प्रशासनाचा 'मलमपट्टी'चा प्रयत्न फोल

मलकापूर (Malkapur Municipal) शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि वाहनधारकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या समस्येची दखल घेत प्रहारचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी ३० जून रोजी नगर परिषद मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले होते व तातडीने शहरातील सर्व खड्डे बुजविण्याची मागणी केली होती. या निवेदनानंतर १ जुलैपासून नगर परिषद प्रशासनाने काही मोजक्या ठिकाणी मुरूम, खडी व चुरी टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. मात्र, हे काम केवळ नावापुरते आणि ठराविक व्ही.आय.पी. भागापुरतेच मर्यादित राहिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

पक्षापाती कारभारावर संताप

शहरातील अनेक मुख्य आणि अंतर्गत रस्ते आजही मोठ्या खड्ड्यांनी व्यापलेले असून, नागरिकांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषद प्रशासन काही ठराविक भागांनाच प्राधान्य देत असून, उर्वरित शहरावर अन्यायकारक पद्धतीने दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप अजय टप यांनी केला आहे. प्रशासनाचा हा दुजाभाव नागरिकांच्या संतापात भर घालणारा ठरत आहे.

मुख्याधिकारी गैरहजर, खुर्चीलाच दिले 'बेशरम'चे झाड

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मुख्याधिकार्‍यांना जाब विचारण्यासाठी अजय टप हे आपल्या कार्यकर्त्यांसह नगर परिषद कार्यालयात गेले होते. मात्र, इतकी गंभीर परिस्थिती असतानाही मुख्याधिकारी आपल्या कार्यालयात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. (Malkapur Municipal) प्रशासनाच्या या बेजबाबदार आणि असंवेदनशील भूमिकेमुळे संतप्त झालेल्या अजय टप यांनी मुख्याधिकार्‍यांच्या रिकाम्या खुर्चीलाच ‘बेशरम'चे झाड अडकवून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

​तीव्र जनआंदोलनाचा इशारा

शहरातील जनता खड्ड्यांमुळे हैराण आणि अपघातग्रस्त होत असताना (Malkapur Municipal) नगर परिषद प्रशासनाला याचे कोणतेही गांभीर्य राहिलेले नाही, हे यावरून स्पष्ट होते. नगर परिषदेने तात्काळ भेदभाव बाजूला ठेवून शहरातील सर्वच रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास, आगामी काळात प्रहार संघटनेच्या वतीने संपूर्ण शहराला सोबत घेऊन याहून अधिक तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहारचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी दिला आहे.