Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > पुणे

MAHATET 2026 ऑनलाईन अर्जासाठी पुन्हा संधी; मुदतवाढ जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६ संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.


mahatet 2026 ऑनलाईन अर्जासाठी पुन्हा संधी मुदतवाढ जाहीर

MAHATET 2026 |

परीक्षार्थ्यांच्या मागणीनंतर २४ एप्रिलपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू

पुणे (MAHATET 2026) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६ संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षार्थ्यांच्या मागणीचा विचार करून ऑनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट २०१३ नुसार MAHATET २०२६ परीक्षा रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मूळ मुदत २७ मार्च २०२६ ते १६ एप्रिल २०२६ अशी होती.

मात्र अनेक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची विनंती केल्याने परीक्षा परिषदेकडून मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता उमेदवारांना दि. १७ एप्रिल २०२६ ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी ही माहिती अधिकृतरीत्या प्रसिद्ध केली असून, इच्छुक उमेदवारांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन वेळेत अर्ज पूर्ण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related to this topic: