Breaking News
  • दिवे घाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंग साठी रस्ता बंद
  • महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्याला आग, प्रवाशांमध्ये घबराट
  • विदर्भातील २६ मोठ्या धरणांमध्ये सरासरी ४९.७६ टक्के जलसाठा
  • पुणे शहराच्या निम्म्या भागाचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद
  • अमरावती विमानतळावर 'नाईट लँडिंग' पुन्हा रखडले!
  • नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी MIDC परिसरात कंपनीत आग
  • शहादा शिरपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दरोडा...
  • साई नगरीत तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात
  • सोलापूर- मुळेगाव गोळीबारातील मुख्य सूत्रधाराला केले जेरबंद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कर्जमुक्ती योजना ई-केवायसी

कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Loan Waiver Scheme e-KYC: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हिंगोली पाचही तालुक्यांतील 44 हजार 213 पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य शासनाच्या flrs.maharashtra.gov.in


कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Loan Waiver Scheme e-KYC |

 

अडचणींसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय हेल्पलाईन उपलब्ध

हिंगोली (Loan Waiver Scheme e-KYC) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील 44 हजार 213 पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य शासनाच्या flrs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी आणि ॲग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी तातडीने पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेस जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी सुजीत झोडगे उपस्थित होते.  जिल्हाधिकारी गुप्ता म्हणाले की, लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्ज खात्याशी आधार क्रमांक अचूकपणे जोडलेला असल्याची खात्री करून ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच ॲग्रीस्टॅकवर नोंदणी झाल्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नसल्याने सर्व पात्र शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. आधार प्रमाणीकरणावेळी रकमेत तफावत, कर्ज खात्याशी आधार क्रमांक जुळत नसणे किंवा इतर तांत्रिक अडचणी आल्यास flrs.maharashtra.gov.in पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध असून, जिल्हास्तरीय समितीमार्फत त्याचे तातडीने निराकरण करण्यात येत आहे.  

ते पुढे म्हणाले की, शासनाच्या निकषानुसार दोन लाख रुपयांपर्यंतच्या पात्र थकीत कर्जासाठी कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी संबंधित बँकांमार्फत वन टाइम सेटलमेंट (OTS) प्रक्रियेद्वारे कार्यवाही करण्यात येईल. कर्जमाफीच्या यादीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांच्या नोंदींची पडताळणी करण्यात आली असून त्यामध्ये कोणतीही त्रुटी आढळून आलेली नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेसंदर्भात शंका, तक्रार किंवा तांत्रिक अडचण असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी  विजय गीते, सहकार अधिकारी श्रेणी-1 (7038969535), उमाकांत चौव्हाणकर, सहाय्यक सहकार अधिकारी (9890049482), राजेश बांडे, प्रमुख लिपिक (7507486880), उद्धव सूर्यवंशी, सहकार अधिकारी श्रेणी-1 (9921807635), ज्ञानदेव डुकरे, सहकार अधिकारी श्रेणी-2 (9284787552) यांच्याशी नमूद हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. 

तालुकानिहाय संपर्क अधिकारी
सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी  ए. डी. गुंडे, सहाय्यक निबंधक (7020475834), हिंगोली  व कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी  एम. यू. यादव, सहाय्यक निबंधक (9420433838), वसमत व औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांनी के. एम. कलेतवाड, सहाय्यक निबंधक (8975943111) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कोणताही संभ्रम न बाळगता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या या महत्त्वाकांक्षी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी  पत्रकार परिषदेत केले. 

Related to this topic: