Breaking News
  • तुकाराम मुंढे नांदेडला आल्याची अफवा, भीतीपोटी पान टपऱ्या बंद करून , टपरी चालक पसार
  • तुळजापुरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात नागरिकांचे साखळी उपोषण; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
  • वाशिम शहरात आनंदाचे वातावरण... प्रचंड उकाड्यापासून वाशिमकरांना काहीसा दिलासा
  • अमरावती शहरात सलग तीसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी
  • आकाशवाणी पुणे केंद्राचा वृत्त विभाग बंद होणार असल्याच्या चर्चेमुळे चिंता वाढली
  • पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी न्यायालय 20 तारखेला देणार निकाल
  • नंदूरबारमध्ये सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने मारली विहिरीत उडी
  • आय टी पार्क हिंजवडीत मद्यधुंद तरुणांच्या आलीशान कारने दुचाकीला उडवले
  • सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपकरणांशिवाय आणि निर्धारित नियमांचे उल्लंघन करून नालेसफाईच्या कामावर तैनात केले जात असल्याची तक्रार दाखल झाल्याची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

शेतकरी कर्जमाफी योजना

कर्जमाफीतील योजनेतील जाचक अटी रद्द करून; शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

Farm Loan Waiver Scheme: कर्जमाफी योजना मध्ये जाचक अटीच्या कारणाने शेतकर्यांना लाभासाठी संघर्ष होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना त्वरित रद्द करण्याचा मागा केला.


कर्जमाफीतील योजनेतील जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

Farm Loan Waiver Scheme |

कोरची (Farm Loan Waiver Scheme) : राज्य शासनाने जाहीर केलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी त्यातील जाचक अटीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर पडत आहे ‌. या जाचकटीमुळे राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफी लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे या सर्व जाचकट्टी तातडीने रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी (राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्यावतीने 16 जून रोजी कोरची तहसीलदार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. 

शेतकरी सध्या सततची नापीक, अस्मानी, सुलतानी संकटे, आणि शेतीमालास मिळणारे कवडीमोल भाव यामुळे पूर्णपणे आर्थिक कोंडी सापडला आहे अशा अत्यंत बिकट परिस्थितीत शासन कर्ज माफी साठी लादलेल्या अटी म्हणजे शेतकऱ्यांना जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे. 

2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना असलेले 50 हजार रुपये कर्ज मर्यादा पूर्णपणे रद्द करण्यात यावी एकर कमी परतफेड योजनेअंतर्गत कोणत्याही विलस्ट अटी न घालता शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्यात यावी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्यासाठी लावलेले सलग चार वर्ष नियमित कर्ज फेडीची जाचक अटक त्वरित रद्द करण्यात यावी 2017 च्या कर्जमाफी योजनेसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्राच्या तांत्रिक त्रुटीमुळे लाभार्थ्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी लाभ देण्यात यावा खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर, पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्ज खात्याचे पूर्ण घटन करून नवीन हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

निवेदन देतेवेळी  राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) गट पक्षाचे कार्याध्यक्ष  नंदुभाऊ नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली, बालाजी ठाकरे वडसा,कोरचीचे तालुकाध्यक्ष क्रांती  केरामी , सुषमा कमरो अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महिला),डॉ .मानिक गाहाणे महासचिव, राष्ट्रवादी काँग्रेस कोरची,इसराईन कमरो ,मानुराम कुमरे अध्यक्ष आदिवासी आघाडी राॅ.का.कोरची, यामिनी कोराम, राॅ.का सदस्य, कुमारसाय बोगा , चैत्राम कोल्हे, निजामसाम कोल्हे,संतराम मडावी , गांगसाय कल्लो, ओमप्रकाश कारीहरतार, चंद्रसाय कोल्हे, लालसाय पोरेटी,समारू कल्लो , सिद्धार्थ उंदीरवाडे,यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related to this topic: