Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

युसूफ खान मृत्यू प्रकरण

परभणी, नांदेड पोलीसांवर प्राधिकरणचा ठपका

Yusuf Khan death case: परभणीमध्ये युसूफ खानच्या बेरोगीच्या घटनेत भोकर पोलिस ठाण्यात घडलेल्या विविध कारवाईच्या तपास्यात प्राधिकरणाने वरील पोलिसांचा धक्का घातला.


परभणी नांदेड पोलीसांवर प्राधिकरणचा ठपका 

Yusuf Khan death case |

 

युसूफ खान मृत्यू प्रकरण; भोकर पोलीस ठाणे हद्दीतील घटना...!

परभणी (Yusuf Khan death case) : शहरातील इंदीरा गांधी नगरात राहणारे युसूफ खान यांचे बेपत्ता होणे, भोकर पोलीस ठाणे हद्दीतील मारहाण आणि त्यानंतर मिळालेल्या मृतदेह प्रकरणात मयताच्या भावाने पोलिसात तक्रार प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला होता. सुनावणी अंती प्राधिकरणाने तक्रार अंशत: मंजुर करत परभणी, नांदेड पोलीसांवर ठपका ठेवला आहे. 

रसूल खान युनूस खान पठाण यांनी पोलीस तक्रार प्राधिकरण यांच्याकडे अर्ज केला होता. त्यांचे भाऊ युसूफ खान हे १२ जुन २०२४ रोजी बेपत्ता झाले होते. या प्रकरणात कोतवाली पोलीसात नोंद करण्यात आली. तपासा दरम्यान भोकर पोलीस ठाणे हद्दीतील मारहाणीचे प्रकरण पुढे आले. युसूफ खान यांना या ठिकाणी एका महिलेच्या घरी सदर महिला व तीच्या मुलांनी मारहाण केली होती. भोकर पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान युसूफ खानचा मृतदेह नांदेड जिल्ह्यातील मुतखेड येथे आढळला.

ओळख न पटल्याने शवविच्छेदन करत त्याचा दफनविधी करण्यात आला. दुसर्‍या बाजुला अर्जदार रसूल खान व त्यांच्या परिवारातील व्यक्ती युसूफ खानचा शोध घेत होते. त्यांना नांदेड येथील मृतदेहाविषयी माहिती मिळाली. त्यानंतर अर्जदारांच्या विनंतीवरुन युसूफ खानचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सदर प्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल करावा यासाठी न्यायालयात रिट याचीका दाखल करण्यात आली. कोतवाली पोलीस, भोकर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांचा योग्य ताळमेळ नसल्याने तसेच तपासातील उशिरामुळे युसूफ खानला संरक्षण मिळू शकले नाही. याला जबाबदार पोलीसांवर कारवाई व्हावी यासाठी प्राधिकरणाकडे अर्ज देण्यात आला.

सदर तक्रार मंजुर करण्यात आली आहे. सपोनी राम गिते, पोउपनी जाधव, पोनी.मार्कांड, पोनी.खंदे राई यांच्या विरुध्द युसूफ खान यांच्या बेपत्ता प्रकरणाचा आणि अपघाती मृत्युच्या संदर्भात गैरवर्तनाबाबत विभागीय चौकशी करावी असा निर्णय देण्यात आला आहे.

Related to this topic: