Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी जिल्हा परिषद

परभणीत जि.प.तील कार्यकारी अभियंता डी. ए. घुगे यांची बदली

Parbhani Zilla Parishad: परभणीत जिल्हा परिषदेतील ग्रामीन पाणिपुरवठा विभागातील डि.ए. घुगे यांना बुलढाणा जिल्ह्याला बदलले गेले आहे. या आदेशाचे स्वाक्षर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण


परभणीत जिपतील कार्यकारी अभियंता डी ए घुगे यांची बदली

Parbhani Zilla Parishad |

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुख्य प्रशासकीय अधिकार्‍यांनी काढले आदेश

परभणी (Parbhani Zilla Parishad) : जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता डि.ए.घुगे यांची बुलढाणा जिल्हा परिषदेत बदली झाली आहे. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन गुरव यांच्या स्वाक्षरीने ३० जून रोजी कार्यालयीन आदेश काढण्यात आले आहे.

परभणी येथील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंता म्हणून डि.ए.घुगे यांची कारकिर्द चांगली राहिली त्यांनी आपल्या कारकिर्दीत जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्याच्या काही भागात पाणी पुरवठ्याची कामगिरी केली. त्यांच्या ठिकाणी कोण अधिकारी येणार आहे, हे मात्र अद्याप समजू शकले नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागात जिल्हा परिषद परभणीत कार्यरत असलेले डी.ए.घुगे यांची ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद  बुलढाणा येथे बदली झाली आहे. नविन ठिकाणी रुजू होण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ कार्यमुक्त करावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. 

चंदनखेडे यांची बदली व पतंगे येणार

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग परभणी येथील उपअभियंता डी.एम.चंदनखेडे यांची ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग मौदा जि.प.नागपुर येथे बदली झाली आहे. तसेच मुख्य अभियंता कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथून उपअभियंता एम.पी.पतंगे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग परभणी या रिक्त पदावर येत आहेत.