Voter List Revision: महाराष्ट्रातील मतदारी पुनरिक्षणाच्या आठवड्यातील काळात, हिंगोली आणि जळगाव येथे ९९%+ वाटप दाखल झाला तर शहरांतील गतिमंदी नोंदलेली आहे.
हिंगोली (Voter List Revision) : राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षणाच्या गणना टप्प्याला तीन आठवडे पूर्ण झाले असून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 21 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजताची आकडेवारी जाहीर केली आहे. 30 जून 2026 पासून सुरू झालेला हा टप्पा 8 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये प्रत्येक मतदाराकडे जाऊन विशिष्ट गणना फॉर्मचे वाटप आणि त्यानंतर त्याचे डिजिटायझेशन करण्याचे काम 1 लाख 253 बूथ लेव्हल ऑफिसर्सकडून केले जात आहे.
राज्यात 30 जून 2026 च्या अंतिम मतदार यादीप्रमाणे एकूण 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 मतदार आहेत. आतापर्यंत 8 कोटी 10 लाख 49 हजार 575 मतदारांपर्यंत गणना फॉर्म पोहोचले असून राज्याचे एकूण वाटप 82.83 टक्के झाले आहे. वाटप झालेल्या फॉर्मपैकी 4 कोटी 71 लाख 82 हजार 298 फॉर्म म्हणजेच 48.22 टक्के फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. म्हणजेच अजूनही निम्म्याहून अधिक फॉर्मचे डिजिटायझेशन बाकी आहे.
राज्यातील जिल्ह्यांच्या कामगिरीत मोठी तफावत दिसून येत आहे. ग्रामीण आणि विदर्भ- मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वाटपाचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आहे. हिंगोली जिल्हा यात राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. येथे 9 लाख 69 हजार 385 मतदारांपैकी 9 लाख 68 हजार 973 फॉर्मचे वाटप झाले असून वाटपाचे प्रमाण 99.96 टक्के आहे. येथे 6 लाख 69 हजार 213 फॉर्म डिजिटाइज झाले आहेत. त्यानंतर जळगाव जिल्हा 99.75 टक्के वाटपासह दुसऱ्या स्थानावर आहे. जळगावमध्ये 35 लाख 52 हजार 199 मतदार असून 35 लाख 43 हजार 478 फॉर्मचे वाटप झाले आहे. येथे 21 लाख 60 हजार 538 फॉर्म डिजिटाइज करण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात 20 लाख 89 हजार 965 पैकी 20 लाख 80 हजार 190 फॉर्म वाटप झाले असून वाटप 99.53 टक्के आहे. येथे डिजिटायझेशन 70.95 टक्के आहे. अमरावतीमध्ये 99.43 टक्के, अहमदनगरमध्ये 98.48 टक्के, जालना 98.02 टक्के, परभणी 98.18 टक्के आणि वर्धा जिल्ह्यात 97.63 टक्के वाटप झाले आहे. लातूरमध्येही 97.67 टक्के वाटप पूर्ण झाले आहे.
डिजिटायझेशनच्या बाबतीत यवतमाळ जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. येथे 22 लाख 53 हजार 236 मतदारांपैकी 21 लाख 18 हजार 530 फॉर्म वाटप झाले आहेत आणि त्यापैकी 17 लाख 81 हजार 343 फॉर्म डिजिटाइज झाले आहेत. यामुळे यवतमाळचे डिजिटायझेशन 79.06 टक्के झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 16 लाख 19 हजार 613 पैकी 15 लाख 5 हजार 152 फॉर्म वाटप झाले असून 12 लाख 77 हजार 29 फॉर्म डिजिटाइज झाले आहेत. येथे डिजिटायझेशन 78.91 टक्के आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 94.28 टक्के वाटप आणि 74.12 टक्के डिजिटायझेशन झाले आहे. परभणीत 71.99 टक्के, बुलढाण्यात 70.95 टक्के आणि हिंगोलीत 69.03 टक्के डिजिटायझेशन नोंदवण्यात आले आहे.
याउलट राज्यातील मोठी शहरे आणि त्यांच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये प्रगती मंद आहे. पुणे जिल्ह्यात 90 लाख 80 हजार 173 मतदार आहेत. येथे आतापर्यंत 57 लाख 97 हजार 509 फॉर्मचे वाटप झाले असून वाटपाचे प्रमाण 63.85 टक्के आहे. पुण्यात केवळ 28 लाख 6 हजार 572 फॉर्म डिजिटाइज झाले असून हे प्रमाण 30.91 टक्के आहे. ठाणे जिल्ह्यात परिस्थिती सर्वात चिंताजनक आहे. 74 लाख 50 हजार 515 मतदार असलेल्या ठाण्यात केवळ 41 लाख 25 हजार 331 फॉर्म वाटप झाले आहेत. वाटप 55.37 टक्के आणि डिजिटायझेशन 15.92 टक्के आहे. मुंबई उपनगरात 78 लाख 30 हजार 11 मतदारांपैकी 44 लाख 35 हजार 223 फॉर्म वाटप झाले आहेत. येथे 56.64 टक्के वाटप आणि 15.20 टक्के डिजिटायझेशन झाले आहे. मुंबई शहरात 25 लाख 55 हजार 499 मतदारांपैकी 15 लाख 57 हजार 894 फॉर्म वाटप झाले असून डिजिटायझेशन 24.71 टक्के आहे. पालघरमध्येही वाटप 70.17 टक्के आणि डिजिटायझेशन 26.53 टक्के इतकेच आहे.
नागपूर आणि नाशिक सारख्या मोठ्या जिल्ह्यांमध्येही अपेक्षित प्रगती झालेली नाही. नागपूरमध्ये 46 लाख 38 हजार 589 मतदारांपैकी 35 लाख 45 हजार 390 फॉर्म वाटप झाले असून वाटप 76.43 टक्के आहे. येथे डिजिटायझेशन 36.43 टक्के आहे. नाशिकमध्ये 51 लाख 4 हजार 458 पैकी 39 लाख 74 हजार 288 फॉर्म वाटप झाले असून वाटप 77.86 टक्के आणि डिजिटायझेशन 41.63 टक्के आहे. औरंगाबादमध्ये 80.49 टक्के वाटप आणि 51.38 टक्के डिजिटायझेशन झाले आहे. कोल्हापूरमध्ये 93.52 टक्के वाटप आणि 59.91 टक्के डिजिटायझेशन नोंदवण्यात आले आहे. सोलापूरमध्ये 94.49 टक्के वाटप झाले असून 56.09 टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.
एकूणच राज्यात ग्रामीण भागात वाटपाचे काम समाधानकारक गतीने सुरू असले तरी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या शहरी आणि उपनगरीय भागात वाटप आणि डिजिटायझेशन दोन्हीचा वेग वाढवण्याचे आव्हान निवडणूक यंत्रणेसमोर आहे. 8 ऑगस्ट ही गणना टप्प्याची शेवटची तारीख असल्याने उर्वरित 18 दिवसांमध्ये या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहिमा राबवून प्रलंबित काम पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. मतदार यादीची अचूकता आणि पारदर्शकता राखण्यासाठी हे पुनरिक्षण महत्त्वाचे असल्याने उर्वरित कालावधीत अधिकाधिक फॉर्मचे वाटप आणि डिजिटायझेशन करण्यावर भर देण्यात येणार आहे.