Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

टीईटी परीक्षा रद्द

परभणीत आज होणारी शिक्षक पात्रता परिक्षा (TET) रद्द

TET Paper Leaked: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत रविवार २८ जून रोजी  होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या बाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने  प्रसिध्दी पत्रकाराद्वारे कळवल


परभणीत आज होणारी शिक्षक पात्रता परिक्षा tet रद्द

TET Paper Leaked |

 

जिल्यातील १३ हजार ८४ विद्यार्थी देणार होते परीक्षा 

परभणी (TET Paper Leaked) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत रविवार २८ जून रोजी  होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या बाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने  प्रसिध्दी पत्रकाराद्वारे कळवले आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा (TET Paper Leaked) आज  रविवार २८जून रोजी घेण्याचे प्रस्तावित होते. नीट परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टीईटी  परीक्षेसाठी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केल्या होत्या. तथापि, शनिवार २७ जून रोजी पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड टाकली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकार्‍यांनी पडताळणी केली असता सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) जून २०२६ परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला  आहे. यामुळे रविवार २८ जून रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) (TET Paper Leaked) पुढे ढकलण्यात आली  आहे. याबाबत सखोल चौकशी होण्यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. शिक्षक पात्रता (टीईटी) परिक्षेबाबत अद्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शनिवार २७ जून रोजी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे...!

Related to this topic: