Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

सेनगाव SIR शिबिर

सेनगांव शहरात घेण्यात आलेल्या SIR शिबिर नागरिकांच्या भरघोस प्रतिसादत संपन्न

Sengaon SIR Camp: संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मतदार यादींचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू आहे. या अंतर्गत सेनगाव नगरपंचायत मार्फत सेनगाव शहरात विशेष शिबिराचे आयोजन दिनांक 19 जुलै २०२६ रोजी


सेनगांव शहरात घेण्यात आलेल्या sir शिबिर नागरिकांच्या भरघोस प्रतिसादत संपन्न 

Sengaon SIR Camp |

सेनगाव (Sengaon SIR Camp) : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मतदार यादींचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू आहे. या अंतर्गत सेनगाव नगरपंचायत मार्फत सेनगाव शहरात विशेष शिबिराचे आयोजन दिनांक 19 जुलै २०२६ रोजी सातारकर मंदिर सभागृह येथे करण्यात आले होते. या शिबिरामध्ये भाग क्रमांक 149 , 150,151,152,153,154 मधील मतदाराकरिता फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. सदर शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि 500 हून अधिक नागरिकांनी सदर शिबिरास भेट दिली.

शिबिरामध्ये उपस्थित बीएलओ पर्यवेक्षक सहाय्यक  मतदान अधिकारी यांच्यामार्फत मतदारांचे शंका निरसन करण्यात आले तसेच फॉर्म भरून घेणे ते डिजिटाईज करणे या प्रक्रिया करण्यात आल्या. सदर शिबिरास नगरपंचायत अध्यक्ष ,उपाध्यक्ष , सर्व नगरसेवक तसेच इतर नागरिकांचे सहकार्य लाभले. या (Sengaon SIR Camp) ठिकाणी  कोरडे, तिडके, दुकानदार, जोगी श्रीमती गीते, निर्मळ हे सर्व केंद्रस्तरीय मतदान  अधिकारी व त्यांचे सहाय्यक पूर्ण वेळ उपस्थित होते. पर्यवेक्षक  शेख सर, मुख्याधिकारी तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी   गणेश गांजरे हे देखील उपस्थित होते. तसेच  बोकारे ,  मस्के, दिनकर,  पडोळे,  देशमुख, कोकाटे,   वाघ,  कांबळे व इतर सर्व नगरपंचायत कर्मचारी यांनी सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Related to this topic: