Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > वर्धा

उमेदवार शैलेश अग्रवाल

महाविकास आघाडीच्या उमेदवार शैलेश अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Candidate Shailesh Aggarwal:महाविकास आघाडीचे शैलेश अग्रवाल यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकसाठी उमेदवारी दाखल केली. उपस्थित होते काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, इत्यादींचे नेते व कार्यकर्ते.


महाविकास आघाडीच्या उमेदवार शैलेश अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Candidate Shailesh Aggarwal |

वर्धा (Candidate Shailesh Aggarwal) : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल (Shailesh Aggarwal) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकजुटीने निवडणुकीच्या मैदानात उतरले असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.

आगामी निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवण्याचा दृढ विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला. यावेळी काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी मंत्री रणजित कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संदीप गिऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहराध्यक्ष शिवा राव, विनायक बांगडे, सुभाष गौर, शेखर शेंडे, प्रविण हिवरे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: