Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

महाराष्ट्र जनगणना परिषद

वाशीम येथे सावता परिषदेचे 'एक दिवसीय जनगणना परिषद' आयोजन

Maharashtra Census Council: सावता परिषदेच्या नियोजित 'एक दिवसीय जनगणना परिषद'च्या आयोजनासाठी महाराष्ट्रातील तिन्ही जिल्ह्यांची बैठक वाशीम येथे संपन्न झाली. बैठकीत सावता परिषद


वाशीम येथे सावता परिषदेचे एक दिवसीय जनगणना परिषद आयोजन

Maharashtra Census Council |

 

नियोजनासाठी तिन्ही जिल्ह्यांची बैठक संपन्न

पातूर (Maharashtra Census Council) : येत्या ७ जून रोजी वाशीम शहरात सावता परिषदेच्या वतीने एका विशेष 'जनगणना परिषदेचे' आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील सावता परिषदेचे आणि ओबीसी (OBC) च्या विविध संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. 'जनगणना आणि ओबीसी' या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे एक दिवसीय वैचारिक मंथन पार पडणार आहे.

नियोजनासाठी विश्रामगृहात झाली महत्त्वाची बैठक

या ऐतिहासिक जनगणना परिषदेच्या (Maharashtra Census Council) जय्यत तयारीसाठी रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी वाशीम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील सावता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण नियोजन बैठक वाशीम येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान सावता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष पांडुरंग कोठाळे यांनी भूषवले. बैठकीमध्ये परिषद यशस्वी करण्यासाठी विविध विषयांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली आणि सर्वानुमते ७ जूनची जनगणना परिषद ऐतिहासिक ठरवण्याचा निर्धार करण्यात आला.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या नियोजन बैठकीला तिन्ही जिल्ह्यांतील सावता परिषदेचे मोठे नेटवर्क आणि पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने:
प्रदेश पातळीवरील नेते: प्रदेश सहसचिव प्रवीणभाऊ वाघमारे, प्रदेश उपाध्यक्ष रविभाऊ भांदुर्गे.
जिल्हा व शहराध्यक्ष: लक्ष्मणरावजी निखाडे (अकोला जिल्हाध्यक्ष), दत्ताभाऊ जावळकर (खामगाव जिल्हाध्यक्ष), विलास ढगे (वाशीम जिल्हाध्यक्ष), दिनेशजी सोळंके (अकोला महानगर अध्यक्ष).
महिला व युवा आघाडी: रंजनाताई परिसकर (महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), शेखर जटाळे (युवा आघाडी जिल्हाध्यक्ष), रेखाताई जहीरव (रिसोड महिला आघाडी शहराध्यक्ष), दिपालीताई काळे (रिसोड महिला आघाडी तालुकाध्यक्ष).

तालुका व स्थानिक पदाधिकारी:* रविभाऊ वानखेडे (वाशीम जिल्हा उपाध्यक्ष), चेतन इंगोले (वाशीम शहराध्यक्ष), अजय ढोणे (पातूर तालुकाध्यक्ष), छोटूभाऊ काळपांडे (अकोला जिल्हा उपाध्यक्ष), बाळूभाऊ माल (वाशीम तालुकाध्यक्ष), चेतन शिंदे (मंगरूळपीर तालुकाध्यक्ष).

याशिवाय खामगाव येथून अमोल धामणकर, अमोल चरखे, गजानन उठाळे तसेच महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मंगलाताई भांदुर्गे, शितल जाधव, ज्योती जाधव, नीता जाधव, वंदना वानखडे, सुनिता पुंड, ज्योती इरतकर, अपर्णा सोनवणे, गोदावरी रतकर, गीता भांदुर्गे, ज्योती सोनवणे, शोभा इरतकर, वंदना भांदुर्गे यांच्यासह तीनही जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

परिषदेत नवीन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
बैठकीदरम्यान सावता परिषदेच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक कार्यकर्त्यांनी संघटनेत अधिकृत प्रवेश केला. यामध्ये गजानन ठेंगडे, अमोल गाभणे, सुनील वानखेडे, आकाश गायकवाड आणि रवी खोटे यांचा समावेश असून, सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे संघटनेत स्वागत केले.

पातूर तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

"ओबीसींची जनगणना हा आपल्या हक्काचा आणि भविष्याचा लढा आहे. त्यामुळे ७ जून रोजी वाशीम येथे होणाऱ्या या जनगणना परिषदेसाठी पातूर तालुक्यातील तमाम ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे."
-अजय ढोणे (तालुकाध्यक्ष, सावता परिषद, पातूर)

Related to this topic: