MLA Raju Navghare: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व, अजित पवार यांच्या जयंती निमित्त जनसेवा सप्ताह आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाचे उद्घाटक आ. राजू नवघरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कुरुंदा (MLA Raju Navghare) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील दुर्गा माता मंदिर परिसरात २७ जुलै सोमवार रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व, अजित पवार यांच्या जयंती निमित्त जनसेवा सप्ताह आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाचे उद्घाटक आ. राजू नवघरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कुरुंदा सर्कल सर्कल मध्ये नागरिकांना तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी तसेच महिलांना स्वावलंबी बनवून त्यांच्या हाताला रोजगार मिळावा या उद्देशाने दिवंगत स्व अजित पवार, आ. राजू नवघरे यांच्या प्रेरणेने रुग्णवाहिका व शिलाई मिशन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आशीर्वाद इंगोले यांनी महिला सक्षमीकरणासाठी महिलांना शिलाई मिशन मोफत वाटप सोहळा, आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका सेविकांचा सन्मान सोहळा, रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा तसेच दुर्गामाता मंदीर परिसर, टोकाई माता परिसर, फुलारी आई मंदिर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली याप्रसंगी बोलताना आशीर्वाद इंगोले यांनी सांगितले की माझे राजकीय गुरु, आदर्श व्यक्तिमत्व आ. राजू नवघरे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिलांसाठी स्वखर्चातून 100 शिलाई मशीन मोफत वाटप करण्याचा मानस होता आणि ते मी आज पुर्ण केला असे सांगितले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष. मुंजाजीराव इंगोले, प्रमुख पाहुणे तानाजी बेंडे सभापती कृ. ऊ. बा. वसमत, सचिन भोसले उपसभापती कृ. ऊ. बी. वसमत, बाळूमामा ढोरे अध्यक्ष राजुभैय्या प्रतिष्ठान, जिजामामा हरणे, सतीश नरवाडे, सतीश पोले, दिलीप डाडाळे, गुलाबराव पाटील, किसन चांदणे, रघुनाथ नरवाडे, गजानन डाडाळे, कुंडलिकमामा नरवाडे, हिरामण काचंनगिरै, गौतम ढेंबरे,साहेबराव नरवाडे मुंजाजीराव दळवी, दत्तरामजी इंगोले,चंद्रकांत दळवी, बाबुराव दळवी, अशोकराव दळवी, प्रल्हादराव इंगोले, बबनराव कदम, पांडू मामा शतलवार, यादव इंगोले बाबुराव काळे, दिलीप सोनटक्के, बबनराव शिध्देवार, रंगराव कदम, देवानंद दळवी,बालाजी दळवी, कल्याण दळवी, रवींद्र महाजन, अमोल इंगोले, गजानन दळवी, भगवान इंगोले, काशिनाथ झिळे, युवराज दळवी, रमेश दळवी, उत्तम दळवी, इब्राहिम पठाण, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे आशीर्वाद भैय्या मित्र मंडळाचे कार्यकर्ते अतुल दळवी, झुनाजी इंगोले, हरी दळवी, विशाल खराटे, रखमाजी इंगोले, प्रथमेश गुळगुळे, रियाज पठाण,फिरोज पठाण, अकसर शेख, रितेश इंगोले, दिपक खराटे, गंगुताई त्रिमले, प्रकाश त्रिमले, पार्वतीबाई वाघमारे, वर्षाताई इंगोले, सुदर्शन इंगोले, कन्हैय्या इंगोले, रमेश इंगोले,बाळु शिंदे, दळवी, कार्यक्रमाचे संयोजक आशीर्वाद इंगोले उपस्थित होते. सूत्रसंचालन करुन आभार पांडे यांनी मानले.