Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

महाराष्ट्र एचआयव्ही चाचणी किट्स

महामार्गावर आढळलेल्या एचआयव्ही चाचणी किट्स प्रकरणी त्रिसदस्यीय समितीची चौकशी सुरू

Maharashtra HIV Testing Kits: उदगीर-जळकोट महामार्गावर पोथ्यात भरलेले एचआयवी चाचणीचे किट्स आढळून आले. आरोग्य विभागाने याची गम्भीर जांच करण्यासाठी त्रिसदस्य समिती गठीत केली आहे


महामार्गावर आढळलेल्या एचआयव्ही चाचणी किट्स प्रकरणी त्रिसदस्यीय समितीची चौकशी सुरू

Maharashtra HIV Testing Kits |

उदगीर (Maharashtra HIV Testing Kits) : उदगीर-जळकोट राष्ट्रीय महामार्गालगत नावंदी पाटीच्या पुढे महामार्गाच्या बाजूला उघड्यावर पोत्यामध्ये भरून टाकलेल्या एचआयव्ही चाचणी किट्स आढळून आल्याची बातमी दैनिक देशोन्नतीमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित किट्सचा साठा ताब्यात घेऊन तो सामान्य रुग्णालय, उदगीर येथे सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

या (Maharashtra HIV Testing Kits) प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने त्रिसदस्यीय समिती गठीत केली असून समितीला दोन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर किट्स नेमक्या कोणत्या विभागाच्या ताब्यातील होत्या, त्या महामार्गालगत कशा पोहोचल्या, त्यांची विल्हेवाट नियमांनुसार लावण्यात आली होती का, तसेच यामध्ये कोणाची निष्काळजीपणा अथवा जबाबदारी आहे का, याचा तपास समितीकडून करण्यात येणार आहे.

महामार्गाच्या कडेला वैद्यकीय साहित्य उघड्यावर टाकण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती. विशेषतः आरोग्यविषयक साहित्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास पर्यावरण व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोका निर्माण होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. दरम्यान, चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणामागील वस्तुस्थिती काय आहे, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: