Hingoli bus stand theft: बसमध्ये चढताना कोणीतरी प्रवासी महिलेचे मंगळसुत्र तोडले. ते खाली पडल्यानंतर बंदोबस्तावर उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचार्याच्या निर्दशनास येताच त्यानी सदर महिलेच्या स्वाधीन केले
हिंगोली (Hingoli bus stand theft) : शहरातील बसस्थानकामध्ये प्रवाशांची रक्कम व दागिणे चोरीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. बुधवारी सकाळच्या सुमारास बसमध्ये चढताना कोणीतरी प्रवासी महिलेचे मंगळसुत्र तोडले. परंतु ते खाली पडल्यानंतर बंदोबस्तावर उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचार्याच्या निर्दशनास येताच त्यानी सदर महिलेच्या स्वाधीन केले.
सेनगाव तालुक्यातील हत्ता येथून शिवनंदा दत्ता दळवी ही महिला २९ जुलै रोजी हिंगोलीच्या बसस्थानकावर पुसदला जाण्याकरीता आली होती. (Hingoli bus stand theft) पुसदची बस प्लॅटफार्मवर लागल्याने हिंगोली ते पुसद या बसमध्ये सकाळी १०.३० च्या सुमारास चढत असताना कोणीतरी सदर महिलेचे सोन्याचे मंगळसुत्र चोरण्याच्या उद्देशाने तोडले. परंतु सदर मंगळसुत्र खाली पडले असता बंदोबस्तावर उपस्थित असलेले पोलिस शिपाई भागवत कर्हाळे यांच्या निर्दशनास येताच त्यांनी हे सोन्याचे मंगळसुत्र ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनंदा दळवी या महिलेला सोन्याचे मंगळसुत्र परत देण्यात आले.