Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

अंनिस जिल्हा शाखा

अंनिस जिल्हा शाखेचा घोट येथे शाखा भेट; गाव भेट उपक्रम व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ संपन्न

ANiS District Branch: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्ह्यापैकी घोट शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश्वर वाडीघरे यांचा सन्मान केला. समितीच्या मंडळींनी अंधश्रद्धा निवृत्ती


अंनिस जिल्हा शाखेचा घोट येथे शाखा भेट गाव भेट उपक्रम व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ संपन्न

ANiS District Branch |

 

निलेश्वर वाडीघरे यांचा सत्कार

घोट (ANiS District Branch) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) घोट शाखेच्या वतीने जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 'शाखा भेट, गाव भेट' उपक्रमासह घोट वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश्वर वाडीघरे यांची तिरोडा येथे बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सी. के. कांबळे होते. प्रमुख सत्कारमूर्ती म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश्वर वाडीघरे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून घोट पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, (ANiS District Branch) अंनिसचे राज्य सरचिटणीस विलास निंबोरकर, जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठलराव कोठारे, घोट शाखेचे अध्यक्ष दिनकर लाकडे,कार्याध्यक्ष असिफ सय्यद,परशुराम दुधबावरे, बाबुराव भोवरे,बबलू शाहा, रविंद्र सोमनकर,शिवराम गुरनुले,बंडू जुवारे, आनंदराव सिडाम, उमेश सरकार, प्रकाश बरडे, पत्रकार हेमंत उपाध्ये, वामन गुरनुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समाजप्रबोधनाच्या कार्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच निलेश्वर वाडीघरे यांनी घोट परिसरात कार्यरत असताना विविध सामाजिक उपक्रमांमध्ये दिलेल्या योगदानाचा गौरव करून त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव शिवराम मोगरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंनिस घोट शाखेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.*