Breaking News
  • वर्धा नदीत पाच मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला
  • पुणे विषारी दारू प्रकरण: राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

महाराष्ट्र वित्तीय जनजागृती

वित्तीय जनजागृती सोबत पीडित कुटुंबाला आधार...

Maharashtra Financial Awareness: गावातील 'वित्तीय समावेशन व जनजागृती' कार्यक्रमामध्ये ग्रामीण आर्थिक साक्षरता व पीडित कुटुंबाला आधार दिला. गीत दुरबसिंग कोरेटी यांचे निधन पाहून पीडित कुटुंब


वित्तीय जनजागृती सोबत पीडित कुटुंबाला आधार

Maharashtra Financial Awareness |

कोरची (Maharashtra Financial Awareness) : तालुक्यातील देउळभट्टी गावात वित्तीय साक्षरतेचा संदेश देत सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडवणारा “वित्तीय समावेशन व जनजागृती” कार्यक्रम उत्साहात पार पडला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तत्वाखाली, बँक ऑफ महाराष्ट्रच्या मार्गदर्शनात आणि क्रिसिल फाउंडेशनच्या सहकार्याने वित्तीय साक्षरता केंद्र कुरखेडा अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन क्षेत्र समन्वयक दिनेश मेश्राम यांनी केले.

कार्यक्रमात गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय आर्थिक योजनांची माहिती जाणून घेतली. बचत सवयी, विमा संरक्षण, डिजिटल व्यवहारांची सुरक्षितता, तसेच आर्थिक नियोजनाचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागात आर्थिक साक्षरतेचा अभाव दूर करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित करण्यात आली.

दरम्यान, गावातील गिता दुरबसिंग कोरेटी यांचे अचानक  दुर्दैवी निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच, या घटनेत सामाजिक संवेदनशीलतेचेही उदाहरण पाहायला मिळाले.  दिनेश मेश्राम, कविता टाटपालन ग्रामसखी यांनी तत्काळ पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला. याशिवाय (Maharashtra Financial Awareness) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) अंतर्गत विमा दाव्यांची प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी आवश्यक ती मदत केली.

२८ मे २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात  दि गडचिरोली डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक शाखा कोटगुलचे  बँक मॅनेजर जांभुळकर सर, प्रधान सर, दिनेश मेश्राम एफ सी बन्सोड सर सीसी उमेद संगिता कोरेटी बँकसखी कविता टाटपालन ग्रामसखी उमेद, प्रनाली टेंभुर्णे ग्रामसखी उमेद, गोपीका उमरे ग्रामसखी उमेद,चंचल बोरकर ग्रामसखी उमेद,
यांच्या उपस्थितीत वारसदारणा २,००००० चा धनादेश देण्यात आला  नागरिकांना बँकिंग सेवांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन करत, आर्थिक साक्षरता ही काळाची गरज असल्याचे नमूद केले.

एकीकडे वित्तीय जागरूकतेचा (Maharashtra Financial Awareness) संदेश आणि दुसरीकडे संकटात सापडलेल्या कुटुंबाला दिलासा या दुहेरी भूमिकेमुळे हा कार्यक्रम केवळ माहितीपर न राहता सामाजिक जबाबदारीचे प्रतीक ठरला.

Related to this topic: