Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलीत ७१ शेतरस्त्यांचे लोकार्पण

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज, दि. २२ जुलै २०२६ रोजी चिखली विधानसभा मतदारसंघात तब्बल ९१ किलोमीटर लांबीच्या ७१ शेतरस्त्यांचे लोकार्पण


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलीत ७१ शेतरस्त्यांचे लोकार्पण

CM Devendra Fadnavis |

 

आ. श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकारातून शेतरस्त्यांची क्रांती

९१ किलोमीटर लांबीच्या ७१ शेतरस्त्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा; विकासाला मिळाली नवी गती

चिखली (CM Devendra Fadnavis) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज, दि. २२ जुलै २०२६ रोजी चिखली विधानसभा मतदारसंघात तब्बल ९१ किलोमीटर लांबीच्या ७१ शेतरस्त्यांचे लोकार्पण करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे साकारलेल्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षांची अडचण दूर होऊन शेती उत्पादनाची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत असून, त्याच धर्तीवर आमदार श्वेता महाले पाटील यांनी चिखली विधानसभा मतदारसंघात शेतरस्त्यांचे जाळे उभारण्यावर विशेष भर दिला आहे. शेतापर्यंत पोहोचणारे रस्ते हे केवळ विकासाचे साधन नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा मजबूत पाया आहेत, ही भूमिका त्यांनी सातत्याने मांडली असून त्याचेच हे मूर्त स्वरूप मानले जात आहे.

या लोकार्पण कार्यक्रमांतर्गत उदयनगर जिल्हा परिषद सर्कलमध्ये  अंकुशराव पडघान पाटील, अमडापूर–ईसोली जिल्हा परिषद सर्कलमध्ये  एकनाथराव जाधव व संजय गाडेकर, तसेच धाड जिल्हा परिषद सर्कलमध्ये तेजराव नरवाडे, योगेश राजपूत आणि  विशाल विसपुते यांच्या हस्ते विविध शेतरस्त्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिखली विधानसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांत रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि शेतीसंबंधित विविध विकासकामांना गती मिळाली असून, त्यामध्ये शेतरस्त्यांची उभारणी हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. पावसाळ्यात चिखलामुळे बंद होणारे मार्ग, शेतमाल वाहतुकीतील अडथळे आणि शेतीकामातील गैरसोय आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि वाहतूक खर्च वाचण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा विकासाभिमुख उपक्रम म्हणजे त्यांच्या ग्रामीण विकासाच्या दूरदृष्टीला दिलेली विकासाची मानवंदना असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिखली विधानसभा मतदारसंघात सुरू असलेली 'शेतरस्त्यांची क्रांती' भविष्यातही अशाच विकासकामांच्या माध्यमातून अधिक व्यापक होणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

याप्रसंगी  शंकरराव साहेबराव तरमळे,  गणेश साखरे पाटील, अरुण पाटील. महादू खडके ज्ञानेश्वर साखरे. विजय साखरे. प्रकाश साखरे. पोलीस पाटील इंदुबाई साखरे. निर्मला ताई जाधव. गजानन तायडे. शरद .पालकर उद्धव साखरे. संदीप इंगळे. बबनराव जाधव. गुलाबराव जाधव. लिंबाजी साखरे संतोष जाधव मदन मोरे समस्त गावकरी मंडळी भडगाव मायंबा उपस्थित होते.

Related to this topic: