Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

धर्मेंद्र प्रधान राजीनामा

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मानोऱ्यात जल्लोष!

Dharmendra Pradhan resigns: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, न्यायासाठी बळी गेलेल्या आंदोलनातील बहाद्दराना श्रद्धांजली अर्पण करत विद्यार्थी एकता मंच च्यावतीने जल्लोष


धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मानोऱ्यात जल्लोष

Dharmendra Pradhan resigns |

मानोरा (Dharmendra Pradhan resigns) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि. २५ जुलै रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, न्यायासाठी बळी गेलेल्या आंदोलनातील बहाद्दराना श्रद्धांजली अर्पण करत विद्यार्थी एकता मंच व उबाठा शिवसेना व इतर पक्षाच्यावतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. 
   
देशभरात नीट परीक्षा, पेपर लिक प्रकरण आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमिततेवरून जंतर मंतर वर वाद निर्माण होऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची विद्यार्थ्यांनी मागणीसाठी आंदोलन पेटविले होते. अखेर त्या आंदोलनाला प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर यश आले. या यशाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी एकता मंच युवक, उबाठा शिवसेना व इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शहरातील छत्रपती चौकात घोषणाबाजी, बळी गेलेल्या २१ आंदोलक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र पवार, प्रकाश राठोड, ठाकूरसिंग चव्हाण, सुनील जामदार, शरद हांडे, अंकुश पवार, महेश राठोड, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रामनाथ राठोड, शिवसेनेचे शहर अध्यक्ष, संतोश पुरी, गोधळेकर पेंटर, आवेश सरमातीया, प्रफुल्ल पाटील, महेंद्र मनवर, संजय वाघमारे, गजानन सोनटक्के, शेख सर, गोपाल चव्हाण, सिद्ध शिकारे, धीरज भगत, लक्ष्मीकांत वाघमारे, इरफान शेख,राजा पटेल, दादाराव आडूळे, अशर, इक्बाल शेख, विष्णू वानखेडे व सुशांत खडसे आदीसह युवकांची उपस्थिती होती.