Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्याने उमेदवारांचा हिरमोड!

Manora Local Election : तालुक्यासह ग्रामीण भागात गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची चर्चा रंगत असताना निवडणुका


स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्याने उमेदवारांचा हिरमोड   

Manora Local Election |

 

जनसंपर्कासाठी केलेल्या खर्चामुळे इच्छुकांचे खिसे झाले रिकामे!

मनोरा (Manora Local  Election) : तालुक्यासह ग्रामीण भागात गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची चर्चा रंगत असताना निवडणुका मात्र सतत लांबणीवर पडत असल्याने भावी उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका कधीही जाहीर होतील या अपेक्षेने अनेक इच्छुक उमेदवारांनी गावोगावी जनसंपर्क वाढवीत विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात आर्थिक सहभाग नोंदविला. मात्र निवडणुकीच्या तारखा जाहीर न झाल्याने आता अनेक भावी उमेदवारांचे खिसे रिकामे झाल्याची चर्चा सुरू आहे.  

 मानोरा तालुक्यात इंझोरी, कुपटा, गिरोली, तळप बु, आसोला खुर्द, फुलउमरी, पोहरादेवी, शेंदुरजना आढाव असे आठ जिल्हा परिषद सर्कल असून पंचायत समितीचे १६  गण आहे. मात्र आरक्षणाचा मुद्दा अजून पर्यंत सुटल्या नसल्यामुळे निवडणुक कधी लागणार हा प्रश्नचिन्ह आहे.  परंतु मागील काही महिन्यांपासून गावातील दुर्गोत्सव, गणपती उत्सव, यात्रा - महोत्सव, क्रीडा स्पर्धा, भजन - कीर्तन कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सत्कार समारंभ तसेच युवक मंडळांच्या उपक्रमांना भावी उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात वर्गणी देण्यात आली. काही इच्छुकांनी गावागावात बॅनरबाजी, वाढदिवस शुभेच्छा फलक, तसेच कार्यकर्त्यांच्या बैठका यावरही मोठा खर्च केला.  

विशेष म्हणजे अनेकांनी मतदारांशी जवळीक वाढविण्यासाठी लग्नसमारंभ, अंत्यविधी, धार्मिक कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रमात सातत्याने उपस्थिती दर्शविली. कार्यकर्त्यांची नाराजी होऊ नये म्हणून वाहन खर्च, भोजन व्यवस्था व इतर कार्यक्रमांवरही मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. काहींनी तर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कर्ज काढून खर्च केल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत आहे. अनेकांनी उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी ऐनवेळी पक्ष बदल करून नेत्यांची मनधरणी केली. मात्र, निवडणुका लांबणीवर गेल्याने हा सर्व खर्च वाया गेल्याची भावना अनेक भावी उमेदवारांत निर्माण झाली आहे.  

राज्यातील प्रभाग रचना, आरक्षणाचा प्रश्न तसेच न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका रखडल्याचे सांगितले जात असले तरी याचा मोठा आर्थिक फटका ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांना बसत आहे. दरम्यान, निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. (Manora Local  Election) निवडणुका नेमक्या कधी लागणार ? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांपासून भावी उमेदवारांपर्यंत चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे राज्य शासन व निवडणूक आयोगाने लवकरात लवकर निवडणुकांबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.  

भाजपात इन्कमिंग सुरू

बँकेचे माजी संचालक सुरेश गावंडे यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत त्यांच्या समर्थकांसह आणि माजी जि. प. चे सदस्य उमेश ठाकरे, माजी सरपंच सुधाकर चौधरी व माजी उपसभापती महेश राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला रामराम करत नुकतेच भारतीय जनता पक्षात समर्थकांसह जाहीर प्रवेश केला आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकावर डोळा ठेवून तिकिटासाठी प्रवेश केल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.

Related to this topic: