Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा

Leopard Attack

Father's Day ला धाडसी पित्याची शौर्यगाथा! लेकीला वाचवण्यासाठी बिबट्याशी झुंज; जीव वाचवताना बाप-लेक विहिरीत कोसळले

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने फादर्स डेच्या दिवशी पित्याच्या निस्वार्थ प्रेमाची आणि धाडसाची प्रचिती दिली.


fathers day ला धाडसी पित्याची शौर्यगाथा लेकीला वाचवण्यासाठी बिबट्याशी झुंज जीव वाचवताना बाप-लेक विहिरीत कोसळले

Leopard Attack |

अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे थरारक घटना; चार वर्षीय अवनीची बिबट्याच्या तावडीतून सुटका, दोघांवर संगमनेरमध्ये उपचार सुरू

अहिल्यानगर (Leopard Attack) : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने फादर्स डेच्या दिवशी पित्याच्या निस्वार्थ प्रेमाची आणि धाडसाची प्रचिती दिली. डोंगरगाव येथे चार वर्षांच्या मुलीला बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी एका वडिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बिबट्याशी झुंज दिली. मुलीची सुटका करण्यात यश आल्यानंतर मात्र अंधारामुळे समोरची विहीर न दिसल्याने बाप-लेक दोघेही त्यात कोसळले. या दुर्घटनेत दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास डोंगरगाव येथे घडली. मनोज गुंजाळ यांच्या चार वर्षीय मुलगी अवनी ही आईच्या पाठीवर असताना घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने अवनीला जबड्यात पकडत अंधाराच्या दिशेने ओढण्यास सुरुवात केली.

मुलीच्या किंकाळ्या आणि आईचा आर्त आरडाओरडा ऐकताच मनोज गुंजाळ यांनी कोणताही विलंब न करता बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी बिबट्याशी प्रत्यक्ष झुंज देत अवनीची सुखरूप सुटका केली.

मुलीला कडेवर घेऊन घराकडे धावत असताना अंधारामुळे समोरील विहीर त्यांच्या नजरेस पडली नाही. त्यामुळे मनोज गुंजाळ आणि अवनी दोघेही खोल विहिरीत कोसळले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांनाही विहिरीतून बाहेर काढले.

या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या मनोज गुंजाळ आणि त्यांच्या मुलगी अवनी यांच्यावर सध्या संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपल्या लेकीचे प्राण वाचवण्यासाठी बिबट्याशी निर्भीडपणे सामना करणाऱ्या मनोज गुंजाळ यांच्या धाडसाचे परिसरासह सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related to this topic: