Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मुंबई

Legislative Council

सचिन अहिरांच्या पक्षांतरानंतर आदित्य ठाकरे आक्रमक; 'योग्य ती कारवाई करू', स्पष्ट इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.


सचिन अहिरांच्या पक्षांतरानंतर आदित्य ठाकरे आक्रमक योग्य ती कारवाई करू स्पष्ट इशारा

Legislative Council |

शिंदे गटात प्रवेश करून उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल; 'ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' असा आदित्य ठाकरेंचा आरोप

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत पक्ष सोडून जाणाऱ्यांवर निशाणा साधला असून, सचिन अहिर यांच्यावर पक्षांतर्गत योग्य ती कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे मराठवाडा आणि विदर्भाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असतानाच एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांच्याशी संपर्क साधत त्यांना आपल्या गटात सहभागी करून घेतले. पक्षप्रवेशानंतर सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.

या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, "ज्या जवळच्या लोकांना पक्षाकडून सर्वकाही मिळतं, तेच स्वतःच्या स्वार्थासाठी निघून जातात. त्यामुळे यात धक्का बसण्यासारखं काहीही नाही."

वरळी आणि शिवडी हे शिवसेनेचे बालेकिल्ले असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी सांगितले, "वरळी आणि शिवडी हा आमचा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. आम्ही तिथे सातत्याने काम केलं आहे. त्यामुळे कोणाच्या जाण्याने आम्हाला धक्का बसत नाही."

सत्ताधाऱ्यांवर टीका करत त्यांनी सवाल उपस्थित केला की, "अजून काय पाहिजे तुम्हाला? अजून किती ओरबाडणार? अनेक पदं देऊनही अजून काय हवं आहे?"

पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले, "जे आपल्या मंदिरांची लूट करत आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही कसे बसू शकता? ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे, त्यांच्यासोबत तुम्ही कसे जाऊ शकता?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेवर भाष्य करत त्यांनी आरोप केला की, "आम्ही सखोल अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की, हे 'ऑपरेशन टायगर' नसून 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे."

विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "उपसभापतीपदावर भाजपचाच एखादा कार्यकर्ता का बसलेला नाही? याचा विचार भाजपनेच करायला हवा," असे ते म्हणाले.

सचिन अहिर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार का, असा प्रश्न विचारण्यात आला असता आदित्य ठाकरे यांनी, "जी काही योग्य कारवाई असेल ती आम्ही निश्चितपणे करू," असे स्पष्ट केले.

याचवेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांबाबतही प्रश्न उपस्थित करत म्हटले की, "भाजपचे अनेक कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करत आहेत. मग त्यांना कोणतेही मोठे पद का मिळत नाही?"

Related to this topic: