Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

लातूर काँग्रेस आंदोलन

राम मंदिर देणगीतील अपहाराच्या निषेधार्थ उद्या लातूरमध्ये काँग्रेसचे आंदोलन!

Latur Congress Protest: लातूर जिल्ह्यात आयोध्यावरील राममंदिर देणगीताचा अपहरणासंबंधी आपत्तीचा समोर आलेला काँग्रेसचा 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह ७ ऑक्टोबर, सकाळी १०:३० वाजता गंजगोलाई येथे


राम मंदिर देणगीतील अपहाराच्या निषेधार्थ उद्या लातूरमध्ये काँग्रेसचे आंदोलन

Latur Congress Protest |

 

गंजगोलाईत आई जगदंबेच्या आरतीने होणार रघुपती राघव राजाराम सत्याग्रह!

लातूर (Latur Congress Protest) : आयोध्यातील राम मंदिर देणगीतील कथित अपहार व भ्रष्टाचार प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी प्रदेश काँग्रेसने एल्गार पुकारला असून उद्या मंगळवारी (दि.७) काँग्रेसच्या वतीने 'रघुपती राघव राजाराम सत्याग्रह' करण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता लातूर येथील श्री गंज गोलाई येथे जगदंबेला महाआरती करून हे आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावाने देशभरातील भाविकांकडून गोळा करण्यात आलेल्या देणग्यांमध्ये झालेल्या अपहाराच्या विरोधात राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी लातूरमध्ये (Latur Congress Protest) काँग्रेस पक्षाकडून अभिनव मार्गाने आंदोलन केले जाणार आहे. या सत्याग्रहाची सुरुवात लातूरचे ग्रामदैवत असलेल्या गंजगोलाई परिसरातील आई जगदंबेच्या चरणी महाआरती अर्पण करून होईल. त्यानंतर भजन व 'रघुपती राघव राजाराम' या रामधूनने सत्याग्रह करत संबंधित अपहार प्रकरणाचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे.

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

भाविकांच्या सत्तेची खेळणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या 'रघुपती राघव राजाराम सत्याग्रहात' लातूर शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य,आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे व सेलचे प्रमुख, कार्यकर्ते तसेच लातूरच्या सर्वसामान्य नागरिकांनी सकाळी ठीक १०:३० वाजता गंज गोलाई येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळेकर यांनी या संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related to this topic: