Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

लातूर वाहतूक पोलीस

वाहतूक नियंत्रण शाखेतील 'तो' पोलीस अखेर निलंबित!

Latur Traffic Police: लातूर जिल्ह्यातील वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल शरद कांदे याने मिनी मार्केट भागात चुकीच्या पद्धतीने मोटार सायकलस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर दुभाजकावर आघात


वाहतूक नियंत्रण शाखेतील तो पोलीस अखेर निलंबित 

Latur Traffic Police |

लातूर (Latur Traffic Police) : शहरात वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलने मिनी मार्केट भागात चुकीच्या पद्धतीने मोटार सायकल स्वारास थांबविण्याचा प्रयत्न केल्यानंतर मोटार सायकलस्वार दुभाजकावर आदळल्याची घटना माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेत अखेर त्या कॉन्स्टेबलला निलंबित केले आहे. विशेष म्हणजे विभागीय चौकशीचे आदेशही पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

7 जून रोजी मिनी मार्केट येथे वाहतूक नियंत्रण शाखेतील अंमलदार पोकॉ/820 शरद कांदे हे (Latur Traffic Police) वाहतूक नियमानासाठी थांबले असता त्या ठिकाणी एका मोटरसायकल स्वारास चुकीच्या पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पडल्याचे क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

त्या (Latur Traffic Police) प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री.अमोल तांबे, पोलीस अधीक्षक लातूर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांना यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साळवे यांनी चौकशी अहवाल सादर केला असून त्यामध्ये पोलीस अंमलदार शरद कांदे यांनी कसुरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना तात्काळ निलंबन करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Related to this topic: