Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

Land Dispute

शेतजमिनीच्या वादातून मारहाण; ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली चौघांविरुद्ध गुन्हा

शेतजमिनीच्या वादातून एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण केली.


शेतजमिनीच्या वादातून मारहाण ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली चौघांविरुद्ध गुन्हा

Land Dispute |

चिखली : तालुक्यातील शेलगाव जहांगीर येथील शेतजमिनीच्या वादातून एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी चार जणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलगाव जहांगीर येथील कु. प्रतीक्षा रमेश साळवे (वय २३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या कुटुंबाची गट क्रमांक ८५ मधील शेतजमिनीबाबत न्यायालयात वाद सुरू असून, यापूर्वीही संबंधित प्रकरणात मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

३० जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी व तिची आई शेतात कचरा व तण काढत असताना आरोपी तेथे आले. शेतात कशासाठी आलात, असा जाब विचारत त्यांनी वाद घातला. त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करत लाकडी काठी व लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या मारहाणीत फिर्यादीच्या आईच्या डोक्यासह हात, पाय व शरीराच्या इतर भागांना दुखापत झाली. फिर्यादीलाही मारहाण करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

घटनेनंतर ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती देण्यात आली. जखमी महिलेला प्रथम ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात शिवाजी किसन शिराळे, किसन सुखदेव शिराळे, जिजाबाई किसन शिराळे व सुनील किसन शिराळे (सर्व रा. शेलूद, ता. चिखली) यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ मधील कलम ३(१)(w)(i), ३(१)(w)(ii), ३(२)(va), ३(१)(r), ३(१)(s) तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ७४, ७५, ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५१(३), ३५२ आदी कलमान्वये गुन्हा क्रमांक ५७२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रदीप मुरलीधर पाटील करीत आहेत.

Related to this topic: