Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

Land Dispute

परभणीत तीस गुंठ्याच्या जमिनीच्या वादातून भावावर कत्तीने जीवघेणा हल्ला

फिर्यादी व आरोपी हे सख्खे भाऊ असून त्यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून शेतातील तीस गुंठे जमिनीवरून वाद सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


परभणीत तीस गुंठ्याच्या जमिनीच्या वादातून भावावर कत्तीने जीवघेणा हल्ला

Land Dispute |

सिरसम शिवारातील घटना; गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल

परभणी (Land Dispute) : गंगाखेड तालुक्यातील सिरसम शिवारात सख्ख्या भावांमधील तीस गुंठे शेतजमिनीच्या वादातून एका भावावर धारदार कत्तीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना १९ जून रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी २१ जून रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत उद्धव मुरकुटे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी व आरोपी हे सख्खे भाऊ असून त्यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून शेतातील तीस गुंठे जमिनीवरून वाद सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी शेतात ट्रॅक्टरने पाळी घालत असताना आरोपींनी संगनमत करून धारदार कत्ती, कुर्‍हाड व काठी घेऊन घटनास्थळी येत, "तू इथे पाळी का घालतो?" असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादीला ट्रॅक्टरवरून खाली उतरवून जीवे मारण्याच्या उद्देशाने हातातील कत्तीने मानेवर वार करण्यात आला. फिर्यादीने तो वार चुकविल्याने मानेऐवजी कानाला गंभीर दुखापत झाली.

तसेच फिर्यादीला कुर्‍हाडीच्या दांड्याने मारहाण करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून तिलाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी माधव मुरकुटे, सिंधु मुरकुटे आणि साक्षी मुरकुटे यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोखंडे करीत आहेत.

Related to this topic: