Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

सोनम वांगचूक समर्थन

सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ मानोऱ्यात भव्य आक्रोश रॅली !

Sonam Wangchuck Support: महाराष्ट्रातील शिक्षण संशोधन प्रकरणावर समरथनार्थ एक आंदोलन करणाऱ्यांना लडाखच्या विद्यार्थी व समाजसेवक नेतृत्वाने शिक्कामोर्चा केला. जंतर-मंतर येथे उपोषण


सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ मानोऱ्यात भव्य आक्रोश रॅली

Sonam Wangchuck Support |

मानोरा (Sonam Wangchuck Support) : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेले लडाखचे ख्यातनाम शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या देशहिताच्या प्रमुख मागण्यांसाठी दि. २० जुलै २०२६ रोजी विद्यार्थी एकता संघ मानोरा यांच्यावतीने शहरात भव्य आक्रोश रॅली काढण्यात आली. सकाळी ११.३० वाजता पंचायत समिती कार्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चात मानोरा तालुक्यातील विविध समाजसेवा संघटना, राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार, विद्यार्थी,  पालक वर्ग आणि नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्च्याच्या सांगतेनंतर तहसीलदार यांच्यामार्फत भारताच्या महामहीम राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.  

आंदोलनादरम्यान केंद्र सरकार मुर्दाबाद, भाजपा मुर्दाबाद, भारत माता की जय, संविधान अमर रहे आणि या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला व केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला.   नीट सारख्या उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रवेशासाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणाची नैतिक, प्रशासकीय व राजनैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा, लडाखला राज्याचा दर्जा देऊन सोनम वांगचूक यांच्या प्रदीर्घ आंदोलनाची दखल घेऊन लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा,  लडाखचा समावेश घटनेच्या सहाव्या परिशिष्टात करावा.  

केंद्र सरकारने या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास १५ ऑगस्टपासून देशभर तीव्र आंदोलन व उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, युवा नेते ॲड ज्ञायक पाटणी, उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख रविंद्र पवार, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रामनाथ राठोड, बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोठे,  वंचितचे तालुकाध्यक्ष विनोद राठोड, शरद हांडे, विजय चव्हाण, विजय पाटील, भावसिंग राठोड,  ठाकुरसिंग चव्हाण, प्रकाश राठोड, बाळासाहेब डेरे, सुनील राठोड, गोपाल चव्हाण, शाम पवार, श्याम राठोड, विशाल राठोड, गजानन सोनटक्के, प्रफुल्ल इंगोले, सुशांत खडसे, अक्षय अंधारे,  आवेश सिरमितिया, किसन वायले, चेतन पवार, बाळू राठोड, आनंदा खुळे, नितीन चगदळ, गणेश जामदार, महेश राठोड, हाफीज खान ,cयांचेसह  सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रास्ताविक शेख यांनी केले तर चिमुकला विद्यार्थी सुनील राठोड यांनी संविधानावर भाषण देऊन केंद्र सरकारवर टीका करत खरपूस समाचार घेतला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून रविंद्र पवार, बाळासाहेब डेरे, इंजिनीयर अभिजित राठोड आदींनी आपले मत व्यक्त केले. संचालन गोपाल चव्हाण यांनी केले तर आभार माणिक डेरे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

न्याय मागणीसाठी उपोषणाला जंतरमंतर बसलेले वांगचुक संपूर्ण देशाच्या युवा वर्गासाठी लढत आहेत. त्यामुळे त्यांना न्याय देण्यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकारने घेतला पाहिजे, परंतु शासन डोळे मिटून तमाशा पाहत आहे. हे अत्यंत गंभीर बाब आहे.
 -ॲड. ज्ञायक पाटणी 

पेपर फुटी प्रकरण, वाढती महागाई याला देशातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी वर्गाने एकजुटीने सरकार विरोधात लढा देण्याची गरज आहे. 
-अरविंद पाटील इंगोले

Related to this topic: