Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कुरूंदा पोलिस कारवाई

कुरूंदा पोलिसांची धडक कारवाई,  रिव्हॉल्वर आणि खंजीरसह तरुणाला अटक

Kurunda Police Action: वसमत ते औंढा जाणाऱ्या रस्त्यावरील कोर्टा पाटी येथील राज बार अँड रेस्टॉरंटमध्ये अवैध शस्त्र बाळगून बसलेल्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे.


कुरूंदा पोलिसांची धडक कारवाई  रिव्हॉल्वर आणि खंजीरसह तरुणाला अटक

Kurunda Police Action |

हिंगोली (Kurunda Police Action) : जिल्ह्यातील कुरूंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. वसमत ते औंढा जाणाऱ्या रस्त्यावरील कोर्टा पाटी येथील राज बार अँड रेस्टॉरंटमध्ये अवैध शस्त्र बाळगून बसलेल्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे.

आज 8 जुलै 2026 रोजी कुरूंदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिवाजी पुरी हे सहकारी पोलीस अंमलदारांसह हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राज बार अँड रेस्टॉरंटमध्ये एक इसम जवळ रिव्हॉल्वर आणि धारदार खंजीर घेऊन बसला आहे. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी तातडीने सहकारी पोह. भगवान वडकिल्ले, पोह. प्रकाश भुरके, पोकॉ. बालाजी वडगावे आणि पोकॉ. बालाजी साठे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली.

तपासादरम्यान तेथे बसलेल्या इसमाला ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विक्रम दत्तात्रय सोनटक्के, राहणार भेंडेगाव तालुका वसमत असे सांगितले. त्याच्या जवळील बॅगची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्यातून एक गावठी रिव्हॉल्वर आणि एक धारदार लोखंडी खंजीर आढळून आले. एकूण 20 हजार 500 रुपये किमतीचा हा मुद्देमाल त्याच्याकडे कोणत्याही प्रकारच्या परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे बाळगल्याचे समोर आले.

याप्रकरणी विक्रम सोनटक्के याच्या विरोधात कुरूंदा पोलीस ठाण्यात गुरनं 274/2026 भारतीय हत्यार अधिनियम कलम 3/25 आणि 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. गंधकवाड हे करीत आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीनिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि वसमतचे चार्ज उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Related to this topic: