Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

कुरखेडा–वाकडी मार्ग

कुरखेडा–वाकडी मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य; नागरिक संतप्त

Kurkheda–Wakdi Road: कुरखेडा नगर पंचायत हद्दीतील कुरखेडा–वाकडी मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत


कुरखेडा–वाकडी मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य नागरिक संतप्त

Kurkheda–Wakdi Road |

 

डंपिंग यार्ड असतानाही रस्त्यावर कचरा टाकण्याचा प्रकार; नगर पंचायतीने कारवाईची मागणी

कुरखेडा (Kurkheda–Wakdi Road) : कुरखेडा नगर पंचायत हद्दीतील कुरखेडा–वाकडी मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही अंतरावर नगर पंचायतीचे डंपिंग यार्ड उपलब्ध असतानाही काही बेजबाबदार नागरिकांकडून रस्त्यालगत कचरा टाकण्याचे प्रकार सातत्याने सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

कुरखेडा–वाकडी मार्ग (Kurkheda–Wakdi Road) हा हिरवाईने नटलेला आणि दोन्ही बाजूंनी झाडांनी वेढलेला रमणीय रस्ता म्हणून ओळखला जातो. सकाळी व सायंकाळी अनेक नागरिक या मार्गावर फिरण्यासाठी येतात. तसेच वाकडी येथील ग्रामस्थ कामानिमित्त दररोज कुरखेडा येथे ये-जा करतात. परिसरातील शेतकरीही शेतीच्या कामासाठी याच मार्गाचा वापर करतात. शालेय विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी या रस्त्याने प्रवास करावा लागतो. मात्र रस्त्यावर व लगत टाकलेल्या,साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी नगर पंचायतीने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यावरील कचरा हटवावा, तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय या मार्गावर "येथे कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे" असे इशारा फलक (बॅनर) लावून दंडात्मक कारवाईची अंमलबजावणी करावी, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नगर पंचायतीने त्वरित पावले उचलून या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related to this topic: