Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

कुरखेडा भिकमांगो आंदोलन

निधी उपलब्ध नाही’ला सुद्गन नागरिकांचे प्रत्युत्तर; कुरखेड्यात कुरखेडा कृती समितीच्या वतीने ‘भिकमांगो आंदोलन’

Kurkheda Bhikmango Andolan: कुरखेडा नगर पंचायत प्रशासनाच्या अकार्यक्षमता, अव्यवस्था, रखडलेली विकासकामे आणि नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ कुरखेडा कृती समिती


निधी उपलब्ध नाही’ला सुद्गन नागरिकांचे प्रत्युत्तर कुरखेड्यात कुरखेडा कृती समितीच्या वतीने ‘भिकमांगो आंदोलन’

Kurkheda Bhikmango Andolan |

 

'नासिर हाशमी यांचे नेतृत्व' 
नगर पंचायतच्या अव्यवस्थेविरोधात कृती समितीचा लोकशाही मार्गाने अनोखा एल्गार; भीक मांगो आंदोलनात जमा झालेली रक्कम सोमवारी नगर पंचायतला सुपूर्द करणार

कुरखेडा (Kurkheda Bhikmango Andolan) : कुरखेडा नगर पंचायत प्रशासनाच्या अकार्यक्षमता, अव्यवस्था, रखडलेली विकासकामे आणि नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ कुरखेडा कृती समिती च्या वतीने शनिवारी आयोजित करण्यात आलेले "भिकमांगो आंदोलन" उत्स्फूर्त प्रतिसादात आणि शांततापूर्ण, लोकशाही मार्गाने यशस्वीरित्या पार पडले.

आंदोलनाची सुरुवात शहरातील फवारा चौक येथून झाली. तेथे एकत्र आलेल्या आंदोलनकर्त्यांनी कुरखेडा कृती समितीच्या नेतृत्वाखाली मुख्य बाजारपेठेत पदयात्रा काढत व्यापारी, नागरिक व विविध प्रतिष्ठानांना भेटी दिल्या. नगर पंचायत प्रशासनाकडून वारंवार "निधी उपलब्ध नाही" हे कारण देऊन मूलभूत नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा निषेध व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात भीक मागून जनजागृती केली.

आंदोलनादरम्यान नागरिक व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक मदत देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. या माध्यमातून जमा झालेली रक्कम सोमवारी कुरखेडा नगर पंचायत कार्यालयात अधिकृतपणे जमा करण्यात येणार असून, शहरातील प्रलंबित व रखडलेल्या नागरी सुविधा तातडीने पूर्ण करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याचे कृती समितीने सांगितले.

कृती समितीच्या मते, आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेचा अवमान करणे नसून, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधणे हा आहे. रुग्णवाहिका दुरुस्ती, शीतपेटी उपलब्ध करणे, अपूर्ण समाजभवन पूर्ण करणे, हनुमान मंदिर परिसरातील वॉटर एटीएम सुरू करणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन अदा करणे, स्वच्छ पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतागृह, नाला बांधकाम, सार्वजनिक मूत्रालयाची दुरुस्ती, वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारणे, आठवडी बाजारातील सुविधांमध्ये सुधारणा तसेच इतर प्रलंबित नागरी कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली.

या (Kurkheda Bhikmango Andolan) आंदोलनात आप चे जिल्हाध्यक्ष, कृतीसमितीचे मार्गदर्शक कुरखेडा कृती समिती अध्यक्ष दीपक धारगाये, कुंवर लोकेंद्र शहा सय्याम, सचिव ईश्वर ठाकूर, शहजाद हाशमी, हिरा चौधरी, गणेश चौधरी, हिरा वालदे, रविंद्र साखरे, ताहीर शेख, साहिल सहारे, आसिफ (टोनू) शेख, आकाश उईके, राहुल कोवे यांच्यासह अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कुरखेडा शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात लोकशाही मार्गाने अधिक तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही कुरखेडा कृती समितीच्या वतीने देण्यात आला.

Related to this topic: