Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर

कोरपना ग्रामपंचायत आरक्षण

११ जूनला कोरपना तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींची सदस्य आरक्षण सोडत; इच्छुकांची धाकधूक वाढली!

Gram Panchayat Reservation: कोरपना तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांमध्ये ११ जूनला आरक्षण सोडण्याचे निर्णय घेतले जाणार आहे. या प्रक्रियेमुळे SC, ST, OBC आणि महिलांसाठी राखीव जाग


११ जूनला कोरपना तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींची सदस्य आरक्षण सोडत इच्छुकांची धाकधूक वाढली

Gram Panchayat Reservation |

कोरपना (Gram Panchayat Reservation) : तालुक्यातील राजकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कोरपना तालुक्यातील मुदत संपत असलेल्या एकूण १६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत आगामी ११ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तहसील प्रशासनाने या संदर्भातील अधिकृत पत्र प्रसिद्ध केले असून, या जाहीर प्रक्रियेमुळे तालुक्यातील ग्रामीण राजकारणात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील आवाळपूर,गाडेगाव (विरूर), भरोसा, भोयेगाव, वनोजा, पिपरी, काढोली खुर्द, नारंडा,लोणी, कोडशी खुर्द, नांदगाव, सांगोडा, नोकारी (पाल),शेरज बु,शेरज खुर्द,तळोधी इत्यादी ग्रामपंचायत मध्ये  दि ११ जून ला सकाळी ९ वाजता पासून  आरक्षण सोडत काढण्यात येईल. यामध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) आणि महिलांसाठीच्या राखीव जागांचे वर्गीकरण प्रत्यक्ष सोडत काढून निश्चित केले जाणार आहे.

इच्छुकांचे भवितव्य ठरणार, गणिते बदलणार!
ग्रामपंचायत निवडणुकीची (Gram Panchayat Reservation) पूर्वतयारी म्हणून या आरक्षण सोडतीकडे पाहिले जात आहे. आपले गाव किंवा स्वतःचा प्रभाग कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होतो, यावर अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे 'आपला प्रभाग' सुरक्षित राहणार की राखीव होणार, या भीतीने अनेक विद्यमान सदस्य आणि भावी इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. आरक्षण जाहीर होताच गावागावांतील पॅनल प्रमुखांना आपल्या रणनीतीमध्ये मोठे फेरबदल करावे लागणार आहेत.

या आरक्षण सोडत प्रक्रियेला तालुक्यातील नागरिक, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि इच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या १६ गावांमध्ये आतापासूनच 'आरक्षण कोणाचे निघणार?' यावर चहाच्या टपऱ्यांवर आणि ग्रामपंचायतीच्या पारावर चर्चांना उधाण आले आहे.

Related to this topic: