Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

स्मार्ट मीटर आंदोलन

स्मार्ट मीटरवर संतापाचा स्फोट! कोरचीत शिवसेनेचा इशारा; “जुने मीटर बसवा, नाहीतर आंदोलन”

Smart Meter Andolan: “स्मार्ट मीटरमुळे नागरिकांची लूट सुरू आहे” असा थेट आरोप करत जुने मीटर पुन्हा बसवण्याची मागणी करण्यात आली आहे, शिवसेना तालुका प्रमुख सदाशिव श्यामराव नहाणे


स्मार्ट मीटरवर संतापाचा स्फोट कोरचीत शिवसेनेचा इशारा “जुने मीटर बसवा नाहीतर आंदोलन”

Smart Meter Andolan |

कोरची (Smart Meter Andolan) : कोरची तालुक्यात स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या निर्णयाविरोधात आता संताप उफाळून आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. “स्मार्ट मीटरमुळे नागरिकांची लूट सुरू आहे” असा थेट आरोप करत जुने मीटर पुन्हा बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना तालुका प्रमुख सदाशिव श्यामराव नहाणे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत प्रशासनाला इशारा दिला आहे.

1) वीज बिलात अचानक मोठी वाढ.
2) मीटर रीडिंगवर संशय.
3) स्मार्ट मीटरबाबत अपुरी माहिती.
4) वारंवार वीज खंडित.
5) शेतकरी व ग्रामीण भागाला मोठा फटका.
6) नागरिकांची लूट थांबवा.
7) जुने वीज मीटर तात्काळ बसवा.

या निवेदनावर शहर प्रमुख रमाकांत निबेकर, विभाग प्रमुख अमरसिंह कल्लो, क्रिषणा सहारे  सोमनाथ नुरुटी , योगेश ढवळे या पदाधिकाऱ्यांनी सह्या करून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. राज्यभरात स्मार्ट मीटरवरून वाद सुरू असतानाच कोरचीतही विरोधाची ठिणगी पडली आहे. आता प्रशासन या (Smart Meter Andolan) मागण्यांकडे दुर्लक्ष करते की निर्णय बदलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: