Breaking News
  • परभणीतील हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळला, 30-40 जण दबल्याची माहिती
  • परळीत दिवसाढवळ्या अपहरण ऊसतोडणीच्या'उचल' पैशांवरून तरुणाला गाडीत टाकून पळवले
  • एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा
  • पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे
  • मान्सूनच्या विलंबामुळे मराठवाड्यात खरीप पेरण्या रखडल्या; शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
  • छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेला परिसरातील पुंडलिकनगर येथील महारुद्र हनुमान मंदिराजवळ आज पहाटे दोन मजली बिल्डिंगमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला.
  • सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे विहीरीत टेम्पो कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 40 चाळीस लाख रूपयांची मदत देण्यात आली.
  • डी.आर.डी.ओचे डॉ प्रदीप कुरुलकरवर आरोप निश्चित, खटल्याच्या सुनावणीचा मार्ग अखेर मोकळा
  • छत्रपती संभाजी नगर येथील ATS पथकांच्या १५ टीम कडून विविध भागात धाडी

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणीत आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नातेवाईकाचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या...?

जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकासह गायत्री नगर येथील रहिवाशांनी घेतल्याने पोलीस स्टेशन येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


परभणीत आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नातेवाईकाचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Knife Attack |

सेलूतील गायत्री नगर खून प्रकरण; दोन तास तणावाचे वातावरण,पोलीस प्रशासन हतबल

परभणी (Knife Attack) : परभणीचा सेलु शहरातील गायत्री नगर येथे किरकोळ वादातून झालेल्या चाकू हल्ल्यातील मयत आदित्य प्रधान यांच्या मारेक-यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मृतदेहासह नातेवाईकांनी पोलीस स्टेशन येथे शनिवार १८ रोजी ठिय्या अंदोलन करून जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकासह गायत्री नगर येथील रहिवाशांनी घेतल्याने पोलीस स्टेशन येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की,या प्रकरणातील आरोपी यांनी किरकोळ कारणावरून आनंद दगडू ढोले व आदित्य मिलिंद प्रधान यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. यातील गंभीर जखमी आदित्य मिलिंद प्रधान याचे शूक्रवार १७ रोजी उपचारादरम्यान निधन झाले. तर आनंद ढोले यांची प्रकृती गंभीर असून त्यावर रूग्णालयात उपचार सूरू आहेत. या प्रकरणी संघमित्रा दगडू ढोले यांच्या फिर्यादीवरून आरोपी बुध्दभुषण पिराजी ढगे,अशोक पांडुरंग पाईकराव रवि पांडुरंग पाईकराव ,कुणाल बाळु सोनटक्के, अजय भानुदास उघडे, कविता अशोक पाईकराव, सिमा बुध्दभुषण ढगे सर्व रा. गायत्री नगर सेलु यांच्यावर गुरनं २०५/२०२६ १०३(१),१०९(१),१८९(२),१९१(२),१९१(३),१९०,११५(२),३५२  आन्वये खूनाचा सेलू पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक केली असून पाच आरोपी आद्यापही फरार आहेत.

मयत आदित्य प्रधान याच्यावर पोलीस बंदोबस्तात अत्यंसस्कार करण्यात आले. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिपककूमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक दिपक बोरसे यांच्या आदेशान्वे पोलीस उपनिरिक्षक बलभिम राऊत हे करत आहेत.

​​​​​​​

भांडण सोडवण्यासाठी गेला अन जिव गमावला

आनंद दगडू ढोले यास आरोपी बूद्धभूषण ढगे याने विहाराच्याजवळ जेवण करण्यासाठी बोलवून पैशाची मागणी केली पैसे नसल्याकारणाने आनंद याने जेवनास नकार देवून घरी गेला असता आरोपींनी त्याच्या घरी जावून बाहेर ये म्हणत आनंद बाहेर येताच आरोपी रवि पाईकराव यांने आनंदच्या छातीत चाकूने वार केला तर रविच्या हातातील चाकू घेवून बूद्धभूषण ढगे यांने आनंदच्या पाठीत चाकूने जिवे मारण्याच्या उद्देशाने वार केला. यात आदित्य प्रधान भांडण सोडविण्यासाठी गेला असता आरोपी आशोक पाईकराव याने आदित्य प्रधान याच्या कमरेत चाकू खूपसून खाली पाडले. चाकू कमरेत खूपसलेला असतांना आरोपी अजय भानुदास उघडे याने पायाने चाकू जोरात दाबून जखमी केले. तर आनंद व आदित्य यास आरोपी कुणाल बाळु सोनटक्के याने काठीने मारहाण केली. फिर्यादी व साक्षीदार हे सोडवासोडवी करत असतांना आरोपी कविता अशोक पाइकराव व सिमा बुध्दभुषण ढगे यांना चापटबूक्क्यांनी मारहाण करून नालीत ढकलून दिले. दरम्यान मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेला आन जिव गमावला असाच काहीचा प्रकार म्हणावा लागेल.

मूख्य आरोपी फरार

आदित्य प्रधान याच्या कमरेत चाकू खूपसून खून करणारा आरोपी आशोक पाईकराव यास अद्यापही अटक नसून सदरिल आरोपी फरार आहे. एकूण ५ आरोपींना अटक करण्याचे पोलीसासमोर आव्हान आहे.

Related to this topic: