Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > पुणे

Ketan Agrawal Murder Case

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; कटाची माहिती असलेला आणखी एक तरुण पोलिसांच्या ताब्यात

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात दिवसेंदिवस नवे धागेदोरे समोर येत आहे.


केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट कटाची माहिती असलेला आणखी एक तरुण पोलिसांच्या ताब्यात

Ketan Agrawal Murder Case |

सिया गोयल व चेतन चौधरीची आज न्यायालयात हजेरी; 'लास्ट सीन टुगेदर' सिद्धांत मांडण्याची पोलिसांची तयारी

पुणे (Ketan Agrawal Murder Case) : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात दिवसेंदिवस नवे धागेदोरे समोर येत असून, आता या खुनाच्या कटाची माहिती असलेल्या आणखी एका तरुणाला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी आज संपत असल्याने त्यांना दुपारी अडीचनंतर वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या सुनावणीपूर्वी तपासात समोर आलेल्या नव्या माहितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तपास यंत्रणेला सुरुवातीपासूनच या खुनाच्या कटाची माहिती आणखी काही व्यक्तींना असण्याची शक्यता वाटत होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी विविध तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स आणि इतर माहितीची पडताळणी केली. त्यातून चेतन चौधरीच्या संपर्कात असलेल्या आणखी एका तरुणाचे नाव समोर आले असून त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा तरुण चेतन चौधरीचा वर्गमित्र आहे. केतन अग्रवालच्या खुनाचे नियोजन करताना चेतन आणि सिया यांनी त्याच्यासोबत या विषयावर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, १८ जून रोजी लोहगडावर येण्याचा आग्रहही या दोघांनी त्याच्याकडे धरला होता. मात्र, संबंधित तरुण त्या दिवशी लोहगडावर गेला नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, केतन अग्रवालचा खून झाल्यानंतर चेतन चौधरीने सर्वप्रथम याच मित्राची भेट घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याशिवाय, आरोपी सिया गोयलनेही या तरुणाशी संवाद साधल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यामुळे या तरुणाकडे असलेली माहिती तपासासाठी महत्त्वाची मानली जात असून पोलिसांकडून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी येथील एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तो चेतन चौधरीच्या संपर्कात होता. तसेच, त्याने चेतन आणि सिया या दोघांना केतन अग्रवालचा खून करू नका, असा सल्लाही दिल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

दरम्यान, गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. या कालावधीत पोलिसांच्या हाती लागलेले विविध तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि तपासातील महत्त्वाचे धागेदोरे आज न्यायालयासमोर मांडले जाणार आहेत. आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ मिळावी, यासाठीही तपास यंत्रणा या पुराव्यांचा आधार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. यापूर्वी नसरापूर येथील भीमराव कांबळे प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात 'लास्ट सीन टुगेदर' हा सिद्धांत मांडला होता. त्याच धर्तीवर लोहगडावरील या प्रकरणातही सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि आरोपींच्या हालचालींच्या आधारे 'लास्ट सीन टुगेदर' हा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्याची तयारी पुणे ग्रामीण पोलिसांनी केली असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, तपासादरम्यान आरोपी सिया गोयल हिचा आणखी एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. घटनेच्या दिवशी तिने परिधान केलेले कपडे जप्त करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी तिला तिच्या पुण्यातील निवासस्थानी नेले होते. तपास आणि पंचनामा पूर्ण करून बाहेर पडत असताना माध्यमांचे कॅमेरे पाहून सियाने अश्लील हावभाव केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या वर्तनावर विविध स्तरांतून टीका होत असून, या प्रकाराचीही मोठी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, आज होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीत पोलिसांकडून सादर करण्यात येणारे पुरावे, नव्याने ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाकडून मिळालेली माहिती आणि तपासातील पुढील दिशा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: