Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कनेरगाव नाका घरफोडी

कनेरगाव नाका येथे घरफोडी; अडीच लाखाची रोकड व दागिणे पळविले..

Kanergaon Naka Burglary: काळबांडे कुटुंबीय देवदर्शना यांनी हिंगोलीतील बासंबा पोलिस ठाण्यावर घरफोडी करून दागिणे व २.४९ लाखाचा रोकड माल चोरला आहे


कनेरगाव नाका येथे घरफोडी अडीच लाखाची रोकड व दागिणे पळविले

Kanergaon Naka Burglary |

 

कुटूंबीय देव दर्शनासाठी गेल्याचे संधी साधून चोरट्यांनी केली चोरी 
बासंबा पोलिस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल

हिंगोली (Kanergaon Naka Burglary) : तालुक्यातील कनेरगाव नाका येथील एक कुटूंबीय देवदर्शनासाठी बाहेर गावी गेले असता चोरट्यांनी संधी साधून घरफोडी करून अडीच लाख रुपयाची रक्कम व दागिणे चोरून नेल्याने बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथील काळबांडे कुटूंबीय देवदर्शनासाठी मागिल काही दिवसापूर्वी बाहेरगावी गेले होते. देवदर्शन आटोपून ते गावी परतल्यानंतर त्यांना आपल्या घराच्या हॉलची खिडकी तुटलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यानंतर त्यांनी घर उघडून संपूर्ण पाहणी केली असता घरातील सोन्याचे दागिणे व रोकड असा एकुण २ लाख ४९ हजार ४० रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे त्यांच्या निर्दशनास आले.

त्यावरून १८ जुलैला बासंबा पोलिस ठाण्यात अंतकला दामोदर काळबांडे यांनी दिलेल्या माहितीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे, बासंबा ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे यांनी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जमादार हे करीत आहेत.

Related to this topic: