Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

सावरगाव-कान्होबा धरण

सावरगाव-कान्होबा धरणातील साचलेला गाळ उपसा करावा

Savargaon-Kanhoba Dam: ३५ वर्षांहून जास्त काळात साचलेले गाळ न काढल्याने कान्होबा धरणाची क्षमता कमी होत असल्यामुळे वन्यजीव आणि शेतकऱ्यांचे मोठे संकट पडत आहे


सावरगाव-कान्होबा धरणातील साचलेला गाळ उपसा करावा

Savargaon-Kanhoba Dam |

 

गोरसेनेची जिल्हा वन प्रशासनाकडे मागणी

मानोरा (Savargaon-Kanhoba Dam) : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यकक्षेतील गिरोली वनवर्तुळात येणाऱ्या सावरगाव कान्होबा वनबीटातील धरणात गेल्या ३५ वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होऊन वन्यजीव व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गाळ काढण्यासाठी गोरसेनेने यापूर्वी दि. ०७ जून रोजी तहसीलदारांमार्फत व दि. ०६ जुलै रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी, मानोरा यांना निवेदन दिले होते. मात्र ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर गोरसेनेच्या वतीने पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते जगदीश कमलाबाई धांदू जाधव यांनी दि. १३ जुलै रोजी उपवनसंरक्षक (डिएफओ), वाशिम यांची भेट घेतली. व निवेदन दिले. 

 गोरसेनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सावरगाव कान्होबा (Savargaon-Kanhoba Dam) वनबीटात राज्य शासनाकडून सुमारे ३५ वर्षांपूर्वी या जलप्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे.  धरणाचा काही भाग वनक्षेत्रात येत असल्याचा दावा वनपरिक्षेत्र अधिकारी करतात. सध्या धरणात मोठ्या प्रमाणावर माती व गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. याचा फटका वन्यजीव व परिसरातील शेतकऱ्यांना बसत आहे.  "धरणात साचलेला गाळ पावसाळा संपल्यानंतर पाणी कमी झाल्यावर तात्काळ काढून खोलीकरण केल्यास वन्यजीवांना बारमाही पाणी उपलब्ध होईल, भूजल पातळीत वाढ होईल व शेजारील शेतजमिनीला सिंचनाचा लाभ मिळेल."  

गोरसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल कनीराम चव्हाण व तालुका अध्यक्ष सुनील मधुकर राठोड यांच्यावतीने पर्यावरण प्रेमी जाधव यांनी उपवनसंरक्षकांकडे मागणी केली की, स्थळ पाहणी करून तांत्रिक व प्रशासकीय उपाययोजना करावी.

या (Savargaon-Kanhoba Dam) संदर्भात गोरसेनेने दि. सात जून रोजी तहसीलदार, मानोरा यांच्यामार्फत व दि. ६ जुलै २०२६ रोजी प्रत्यक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी, मानोरा यांना निवेदन देऊन गाळ उपसण्याची मागणी केली होती. परंतु आजतागायत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप गोरसेनेने केला आहे. धरणातील गाळ न काढल्यास वन्यजीव पाण्यासाठी गावात शिरून मनुष्य-वन्यजीव संघर्ष वाढेल व शेतकऱ्यांवर पाणीटंचाईचे संकट ओढवेल. त्यामुळे वन विभागाने  यासंदर्भात शाश्वत उपाय योजना करावी, अन्यथा गोरसेनेला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. 

"सावरगांव कान्होबा धरणातील वर्षानुवर्षे साचलेली गाळ काढण्यासोबतच या वन बीटा संदर्भात करण्यात आलेल्या इतर तक्रारी व समस्यांसंदर्भात सुद्धा आवश्यक ती धोरणात्मक पावले वन प्रशासनाकडून उचलली जातील.
-उपवनसंरक्षक (डीएफओ) वाशिम, जी.आर.माधवराज