Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

Kanhan Police

घरफोडीच्या आरोपीला कन्हान पोलिसांनी कामठी येथून पकडले

कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमनगर येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा अडीच दिवसांत उलगडा करत कन्हान पोलिसांनी एका आरोपीला कामठी येथून अटक केली.


घरफोडीच्या आरोपीला कन्हान पोलिसांनी कामठी येथून पकडले

अडीच दिवसांत आरोपीला अटक; चोरीचा मुद्देमाल जप्त

 

कन्हान (नागपूर) : कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमनगर येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा अडीच दिवसांत उलगडा करत कन्हान पोलिसांनी एका आरोपीला कामठी येथून अटक केली. आरोपीच्या ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने आणि एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, दि. 27 जुलै 2026 रोजी धरमनगर, कन्हान येथील एका घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले जुने वापरते सोन्या-चांदीचे दागिने (किंमत 49 हजार रुपये) तसेच 11 हजार रुपये रोख, असा एकूण 60 हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेण्यात आला.

फिर्यादीच्या तक्रारीवरून कन्हान पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4) व 305(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान घटनास्थळाचा पंचनामा, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी तसेच गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवली. सापळा रचून आकाश (दादू) यशवंत गराडे (वय 27), रा. धरमनगर, कन्हान याला कामठी येथून ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून 49 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई कन्हानच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गिरिधर पेंदोर, पोहवा हरीष सोनभद्रे, पो.शि. अश्विन गजभिये व जीवन विघे यांनी केली. या पथकाने घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणत आरोपीला अटक करण्यात यश मिळविले.

Related to this topic: