Electric wire current: कांद्रीत ११ वर्षीय मुलाला ११ हजार व्होल्ट विद्युत तारेचा करंट लागून गंभीर जखमी झाला, परंतु स्थानिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला.
नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि वेळीच उपचार मिळाल्याने मुलाचा जीव थोडक्यात वाचला
महावितरण व नगरपंचायत प्रशासना विरोधात नागरिकांचा संताप
कन्हान (Electric wire current) : कांद्री नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्र. ६ येथिल वेकोलिच्या मागिल परिसरात घडलेल्या धक्का दायक घटनेत ११ वर्षीय मुलाला ११ हजार व्होल्टेज विद्युत तारेचा करंट लागुन तो गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि वेळीच उप चार मिळाल्याने मुलाचा जीव वाचला असुन त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. या घटने नंतर परिसरातील नागरिकांनी महावितरण विभाग आणि नगरपंचायत प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त करत निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवार (दि.११) मे ला दुपारी १२ वाजता दरम्यान नितीन नरेंद्र सूर्यवंशी हा आपल्या चुलत भाऊ अंकित बिरन सूर्यवंशी आणि अजित श्याम सूर्यवंशी सोबत खेळत होते. खेळता-खेळता नितीन सूर्यवंशी चा हात अचानक खाली झुकलेल्या विद्युत तारेस लागला आणि तो तारेला चिकट ला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन शिवकुमार धुर्वे यांनी प्रसंगवधान राखत काठीच्या साहाय्याने मुलाला तारांपासुन दूर केले. (Electric wire current) घटनेची माहिती मिळताच थानेदा र वैजयंती मंडवधरे या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटना स्थळी दाखल झाल्या. जख्मी मुलाला तातडीने प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यास पुढील उपचा रासाठी मेयो रुग्णालय नागपुर येथे रेफर केले. घटनेची माहिती मिळताच रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी संबंधित अधिकाऱ्यां शी संपर्क साधुन योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
“वेळीच उपाययोजना केली असती तर घटना टळली असती”
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महावितरण विभागावर गंभीर आरोप केले. वेकोलिच्या सततच्या डंपिंगमुळे परिसरात मातीचे ढिगारे वाढल्याने ११ हजा र व्होल्टेजच्या विद्युत तारा धोकादायकरित्या खाली झुकल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी जोरदार वाऱ्यामुळे (Electric wire current) विद्युत पोल कोसळले होते. या बाबत वारंवार तक्रारी व पत्रव्यवहार करून ही महावि तरण विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला. नागरिकांच्या मते “प्रशासनाने वेळेत उपाययोज ना केली असती तर आज एका निष्पाप मुलाचा जीव धोक्यात आला नसता.” या घटनेमुळे परिसरात भीती चे वातावरण निर्माण झाले आहे.
खेळाच्या मैदानाअभावी मुलांचे जीव धोक्यात
कांद्री परिसरात अनेक वर्षांपासुन मुलांसाठी सुरक्षित खेळाचे मैदान नसल्याने मुले धोकादायक स्थळी खेळण्यास प्रवृत्त होत असल्याचा आरोप नाग रिकांनी केला आहे. या संदर्भात १२ फेब्रुवारी २०२६ ला नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन अतिक्रमण हटवुन खेळाचे मैदान, बाजाराची व्यवस्था आणि पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्या ची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याचा आरोप करण्यात आला. घटनेनंतर नागरिकांनी नगराध्यक्ष सुजित पानतावणे यांच्या नेतृत्वातील नगरपंचायत प्रशासन आणि महा वितरण विभागा विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच जख्मी मुलाला तातडीने आर्थिक मदत व नुक सान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान महावितरण विभागाचे अधिकारी श्रीवास्तव यांनी घटनास्थळी भेट देऊन योग्य कार्यवा हीचे आश्वासन दिले. मात्र सामाजिक कार्यकर्ते पवन कुंभलकर, पोलीस पाटील काचन मस्के, निकेश मेश्राम सह संतप्त नागरिकांनी “आश्वास न नको, कायम स्वरूपी उपाय हवा,” अशी ठाम भूमिका घेत प्रशासनाला तातडीने समस्या सोडविण्याची इशारा सह मागणी केली आहे.