Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कळमनुरी वाहतुक शिस्त

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस निरीक्षक रस्त्यावर,55 हजार दंड वसूल

Kalamnuri Traffic Discipline: कळमनुरीच्या वाहतूक रस्त्यावर पोलीसने अवैध प्रवास, नियमांचा उल्लंघन आणि अडथळे तटस्थ करून 55 हजार रुपये दंड वसूल केले.


वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस निरीक्षक रस्त्यावर55 हजार दंड वसूल

Kalamnuri Traffic Discipline |

कळमनुरी (Kalamnuri Traffic Discipline) : कळमनुरी शहरातील वाहतूक सुरळीत व शिस्तबद्ध ठेवण्यासाठी कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वाहतूक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मोटार वाहन कायद्यान्वये विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध 31 कारवाया करण्यात आल्या असून एकूण 35 हजार 750 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कळमनुरी शहरातील तहसील कार्यालय ते नवीन बसस्थानक या मुख्य मार्गावर अनेक वाहनचालक रस्त्यावर आडवे-तिडवे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत. यामुळे नागरिकांना तसेच इतर वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांच्यासह पोलीस कर्मचारी सुजित पुसणाके, किशोर खिल्लारे तसेच होमगार्ड ओमकार नेवरकर, कार्तिक हराळ, अर्जुन मस्के आणि विलास बांगर यांनी सक्रिय सहभाग घेतला.

शहरातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, रस्त्यावर वाहने अव्यवस्थित उभी करू नयेत तसेच अवैध प्रवासी वाहतुकीपासून दूर राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पुढील काळातही अशी कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.