Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कळमनुरीची लोकसंख्या २८ हजारांच्या पार; जनगणनेच्या प्राथमिक टप्प्यात ७,३२६ घरांची नोंद

शहराची प्राथमिक लोकसंख्या २८ हजार ८७६ इतकी नोंदविण्यात आली आहे.


कळमनुरीची लोकसंख्या २८ हजारांच्या पार जनगणनेच्या प्राथमिक टप्प्यात ७३२६ घरांची नोंद

Kalamnuri Census Survey |

कळमनुरी (Kalamnuri Census Survey) : नगरपरिषद प्रशासनाकडून शहरात राबविण्यात येत असलेल्या जनगणना मोहिमेचा प्राथमिक टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून, या टप्प्यात संकलित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कळमनुरी शहरात एकूण ७ हजार ३२६ घरांची नोंद करण्यात आली आहे. तसेच शहराची प्राथमिक लोकसंख्या २८ हजार ८७६ इतकी नोंदविण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जनगणना मोहिमेअंतर्गत गट क्रमांक ३८ मधील सर्व क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्यात आले. नगरपरिषदेने नियुक्त केलेल्या प्रगणक आणि विशेष पथकांनी घराघरांत जाऊन माहिती संकलित केली. यामध्ये कुटुंबातील सदस्यसंख्या, घरांचे प्रकार तसेच विविध मूलभूत आणि नागरी सुविधांबाबतची माहिती नोंदविण्यात आली.

जनगणना मोहिमेचा हा टप्पा यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविराज दरक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. नागरिकांनीही आवश्यक माहिती उपलब्ध करून देत सर्वेक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने हे काम नियोजित कालावधीत पूर्ण होऊ शकले.

नगरपरिषद प्रशासनाच्या मते, या प्राथमिक जनगणनेमुळे शहराच्या लोकसंख्यावाढीचे आणि विस्ताराचे वास्तव चित्र समोर आले आहे. संकलित आकडेवारीचा उपयोग आगामी विकासकामांचे नियोजन, पाणीपुरवठा व्यवस्था, रस्ते विकास, स्वच्छता सुविधा आणि इतर नागरी सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी होणार आहे.

तसेच, वाढत्या लोकसंख्येनुसार शासनाकडून मिळणाऱ्या निधीचे नियोजन आणि योग्य विनियोजन करण्यासाठीही ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. भविष्यातील प्रभागरचना, प्रशासकीय सुविधा आणि शहर विकास आराखडा तयार करतानाही या आकडेवारीचा महत्त्वपूर्ण आधार मिळणार आहे.

प्राथमिक टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता नगरपरिषद प्रशासनाने डेटा पडताळणी आणि पुढील तांत्रिक प्रक्रियेला सुरुवात केली असून, जनगणनेच्या पुढील टप्प्यातील कामकाजही लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Related to this topic: