Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जामदया जिल्हा परिषद कार्यालय

जामदया येथील शाळेच्या वर्ग खोल्यांसाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयात मांडला ठिय्या

Jamdaya Zilla Parishad Office: जामदयातील शाळेच्या ८व्या वर्ग खोल्यांचा डोकेपाटा अत्यधिक नुकसान झाल्याची दावा करण्यात आले. गावस्थाने जिल्हापरिषदला निवेदन करून बांधकामासाठी वित्ताची मागणी


जामदया येथील शाळेच्या वर्ग खोल्यांसाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयात मांडला ठिय्या

Jamdaya Zilla Parishad Office |

हिंगोली (Jamdaya Zilla Parishad Office) : सेनगाव तालुक्यातील जामदया येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्याचे बांधकाम करण्यासाठी ग्रामस्थांनी २९ जुन सोमवार रोजी जिल्हा परिषदेत ठाण मांडत बांधकाम करण्यासाठी निवेदन दिले आहे. 

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जि. प. प्रा. शा. जामदया केंद्र खिल्लार ता. सेनगांव येथे 1 ली ते 8 वी चे वर्ग असून पटसंच्या 160 आहे परंतू शाळेच्या 8 वर्ग खोल्या अतिशय धोकादायक स्थितीत आहेत. त्या वर्ग खोल्यामध्ये वि‌द्यार्थ्यांना बसवता येत नाही. वर्गखोल्यांच्या भिंती व पत्रे अतिशय मोडकळीस आल्यामुळे वर्गखोल्या कोसळु शकतात व पावसाळाच्या दिवसात वर्गखोल्या गळतात.

तसेच सण 2024 मध्ये शाळा बांधकामाबाबत कार्यारंभआदेश आलेला आहे. परंतू प्रत्यक्षात बांधकामास सुरुवात झाली नाही. त्यामुळे  वर्ग खोल्यांच्या बांधकामास निधी देऊन बांधकाम सुरु करावे अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे. सदरील चौकशी व पाहणी  न झाल्यास (Jamdaya Zilla Parishad Office) शाळेला कुलूप लावून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर बाबाराव पोटफोडे, रमेश तनपुरे, संजय गव्हाणे, केशव तनपुरे, उमेश पिंपरकर, रमेश गव्हाणे, नंदु नवघरे, तानाजी नवघरे, ओंकार कोळेकर,सुरज नवघरे, मारोती नवघरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related to this topic: