Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

आंतरराष्ट्रीय योग दिवस

योग दिनी आरोग्यदायी जीवनाचा संकल्प; चिखलीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

International Yoga Day:


 योग दिनी आरोग्यदायी जीवनाचा संकल्प चिखलीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

International Yoga Day |

चिखली (International Yoga Day) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चिखली येथील तालुका क्रीडा संकुलावर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात नागरिक, विद्यार्थी, अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागी होत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना, "योग करूया, निरोगी शरीर, शांत मन आणि सशक्त समाज घडवूया. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी भारतीय संस्कृतीची अनमोल देणगी आहे. नियमित योगाभ्यासातून निरोगी व आनंदी जीवन जगण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा," असे आवाहन केले.

यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची (International Yoga Day) "आरोग्यसंपन्न वृद्धत्वासाठी योग" ही संकल्पना असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सुरू झालेला हा उपक्रम आज जागतिक स्तरावर मानवतेच्या समग्र कल्याणाचे प्रतीक बनल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महर्षी पतंजली आणि प्राचीन ऋषीमुनींनी जगाला दिलेल्या अष्टांगयोगाच्या परंपरेचे महत्त्वही त्यांनी यावेळी विशद केले.

कार्यक्रमात विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. योगशिक्षकांनी उपस्थितांना दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम आयुष मंत्रालय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा, तालुका क्रीडा संकुल समिती चिखली तसेच चिखलीतील विविध योग संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, चिखलीचे नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, विजय सवडे, तहसीलदार तथा कार्याध्यक्ष तालुका क्रीडा संकुल समिती राजेंद्र घोंगे, सहाय्यक निबंधक, गजानन पोफळे (सहाय्यक गटविकास अधिकारी), सागर पुरोहित (शहराध्यक्ष), नगरसेविका प्रिया बनसोडे, आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे, राम बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक, योगशिक्षक आणि सहभागी नागरिकांचे आभार मानण्यात आले.