Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

कारवाईचा धाक इतका की… अकोल्यात छाप्याआधीच कुल्फ्यांचा सडा

अकोला शहरात अन्न व औषध विभागाकडून सुरू असलेल्या जोरदार तपासणी मोहिमेमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाल्याचे चित्र समोर आले आहे.


कारवाईचा धाक इतका की… अकोल्यात छाप्याआधीच कुल्फ्यांचा सडा

Inspection Drive |

तुकाराम मुंढे यांच्या पथकाची तपासणी मोहीम तीव्र; चौहट्टा बाजार परिसरात धाडी, नागरिकांमध्ये भेसळीची भीती

अकोला (Inspection Drive) : अकोला शहरात अन्न व औषध विभागाकडून सुरू असलेल्या जोरदार तपासणी मोहिमेमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अकोला ते अकोट मार्गावरील पळसोद फाट्याजवळ रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कुल्फ्या फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अन्न व औषध विभागाचे वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या पथकाकडून शहरात विविध ठिकाणी सखोल तपासणी मोहीम राबवली जात आहे. याच कारवाईचा धसका घेत काही दुकानदारांनी भीतीपोटी हा माल रस्त्यावर टाकून दिल्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पळसोद फाट्याजवळ हजारोच्या संख्येने आढळलेल्या कुल्फ्या भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाच्या असण्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आरोग्याबाबत चिंता निर्माण झाली असून, अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, अकोला शहरातील चौहट्टा बाजार परिसरात अन्न व औषध विभागाचे पथक सक्रिय झाले असून विविध दूध डेअरी, मिठाई दुकाने आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर धाडी टाकण्यात येत आहेत. संशयित अन्नपदार्थांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत.

या कारवाईमुळे अकोल्यातील अनेक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, या मोहिमेमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एकूणच, अन्न व औषध विभागाच्या या धडक कारवाईमुळे शहरातील अन्नसुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर चर्चा सुरू झाली असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related to this topic: