Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ

विद्यार्थी आंदोलन

विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी यवतमाळमध्ये मोर्चा

Students Yavatmal March: विद्यार्थी आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा सरकारने राजीनामा घेतला. मात्र, यामुळे समस्या सुटणार नाही. सरकारने शैक्षणिक धोरणांत सुधारणा करावी


विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी यवतमाळमध्ये मोर्चा

Students Yavatmal March |

यवतमाळ (Students Yavatmal March) : विद्यार्थी आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा सरकारने राजीनामा घेतला. मात्र, यामुळे समस्या सुटणार नाही. सरकारने शैक्षणिक धोरणांत सुधारणा करावी, यासह इतर मागण्यांसाठी सरकार विरोधात घोषणाबाजी करीत आज रविवारी २६ जुलै रोजी विद्यार्थी हक्क संघर्ष मोर्चाच्या वतीने यवतमाळच्या संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मुळे शाळा बंद केल्या जात आहेत. खासगीकरणामुळे फी वाढत चालली आहे. पेपर फोडणारा माफिया तयार झाला आहे. या (Students Yavatmal March) धोरणाने बहुजन विद्यार्थी पुनः शिक्षणापासून वंचित होत आहेत. रोजगाराचा प्रश्न गंभीर असून, नोकर भरती बंद आहे. याउलट खासगीकरणावर सरकार भर देत आहे. हे थांबले पाहिजे. यासाठी सरकारने केंद्रातील रिक्त ३० लाख पदे तातडीने भरावीत, राज्य शासनानेही ३ लाख पदांची भरती घ्यावी. (Students Yavatmal March) एमपीएसी व यूपीएससी परीक्षा ऑफलाइनच घ्याव्या, तसेच नीट पेपर २२ फुटल्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करावी, त्या विद्यार्थ्यांना शहिदाचा दर्जा द्यावा, गुन्हे मागे घ्यावे, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.

यावेळी ॲड. सीमा तेलंगे, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरमवार, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, अविनाश लोखंडे, गौरव राठोड, पंकज कांबळे, फैजान शेख, भीमराव शिरसाठ, आदित्य गणवीर, बादल वासनिक, कुणाल तिरपुडे, आकाश वाघ, मानसी स्थूल, प्रियंका बागडे, बालाजी बस्सी, हर्षद ठाकरे, प्रणव गोहाणे, सम्यक नगराळे, रोशन हिवाळे, रितेश गवारकर, यश झामरे आदी या मोर्चात सहभागी झाले होते.

Related to this topic: