Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ

नेर डिझेल टंचाई

नेरमध्ये डिझेल टंचाईचा फटका; पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या  लांबच लांब रांगा

Ner Diesel Shortage: नेरमध्ये डिझेल आणि पेट्रोल टंचाईने शेतकऱ्यांना, ट्रॅक्टर मालकांना आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणीत ठेवले आहे.


नेरमध्ये डिझेल टंचाईचा फटका पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या  लांबच लांब रांगा

Ner Diesel Shortage |

नेर (Ner Diesel Shortage) : शहरात निर्माण झालेल्या डिझेल व पेट्रोल टंचाईमुळे शेतकरी, ट्रॅक्टर मालक आणि वाहनधारक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. ऐन शेती मशागतीच्या हंगामात ट्रॅक्टरद्वारे नांगरणीची कामे वेगाने सुरू असताना इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण पसरले आहे. नेर शहरातील विविध पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. अनेक शेतकरी मोठे ड्रम, कॅन आणि इतर भांडी घेऊन डिझेल भरण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

डिझेल (Ner Diesel Shortage) उपलब्ध होणार की नाही, याबाबत अनिश्चितता असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, काही ठिकाणी वाहनधारक आणि नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढविला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर गर्दी नियंत्रणात आणण्यात यश आले.

शेतकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने इंधन पुरवठा (Ner Diesel Shortage) सुरळीत करण्याची मागणी केली आहे. “सध्या शेतीची महत्त्वाची कामे सुरू असून डिझेलअभावी ट्रॅक्टर बंद पडत आहेत. याचा थेट परिणाम शेतीच्या कामांवर होत आहे,” अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. इंधन टंचाई किती दिवस राहणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे.

Related to this topic: