Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ

सेवाग्राम स्थानकावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक; काही गाड्या रद्द, काहींचे थांबे बंद

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर–सेवाग्राम दरम्यान तिसरी व चौथी रेल्वे लाईनच्या कामाअंतर्गत सेवाग्राम स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) प्रणाली व यार्ड रिमॉडेलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे


सेवाग्राम स्थानकावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक काही गाड्या रद्द काहींचे थांबे बंद

Indian Railways |

वर्धा (Indian Railways) : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर–सेवाग्राम दरम्यान तिसरी व चौथी रेल्वे लाईनच्या कामाअंतर्गत सेवाग्राम स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) प्रणाली व यार्ड रिमॉडेलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी ३० मे ते ६ जून २०२६ दरम्यान विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असून या कालावधीत काही रेल्वे गाड्या रद्द, शॉर्ट टर्मिनेट तसेच काही गाड्यांचे थांबे रद्द राहणार आहेत.

६ जून रोजी गाडी क्रमांक 61109 वर्धा–नागपूर मेमू, 61110 नागपूर–वर्धा मेमू, 12219 अमरावती–अजनी एक्सप्रेस आणि 12120 अजनी–अमरावती एक्सप्रेस या गाड्या पूर्णतः रद्द राहतील. तसेच 12810 हावडा–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि 61110 नागपूर–वर्धा मेमू या गाड्यांचा सेवाग्राम स्थानकावरील थांबा ३० मे ते ६ जूनदरम्यान रद्द करण्यात आला आहे.

नागपूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ बंद असल्यामुळे कोचिंग परिचालनावरील परिणामाचा कालावधी ५२ दिवसांवरून ६१ दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे ३० मे ते ७ जूनदरम्यान अतिरिक्त नऊ दिवस रेल्वे वाहतुकीवर परिणाम राहणार आहे. दरम्यान, 11203 नागपूर–मडगाव एक्सप्रेस ही ३० मे ते ६ जूनदरम्यान अजनी स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. तर 11204 मडगाव–नागपूर एक्सप्रेस ही ३१ मे ते ७ जूनदरम्यान अजनी स्थानकावरूनच सुटणार आहे. मध्य रेल्वे नागपूर विभागाने प्रवाशांना प्रवासापूर्वी संबंधित गाड्यांची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Related to this topic: