Breaking News
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
  • रांजणगाव गणपतीजवळ मिक्सर रोडखाली उतरला; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
  • धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 182 पेट्रोल पंपापैकी जवळपास 9 पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा
  • फिसाळलेल्या कुत्र्याने एका सहा वर्षांच्या मुलासह आठ जणांचा चावा घेतल्याची घटना रायगडच्या कर्जतमधून समोर आली आहे
  • सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
  • पंढरपूरमध्ये चालत्या एसटी बसची डिझेल टाकी तुटली; एसटी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
  • बीडमध्ये केज तालुक्यातील जिवाचीवाडी शिवारात रात्री झालेल्या गारपिटीसह वादळी वाऱ्याने शेती पिकांचे नुकसान
  • पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, २ जणांना अटक;पुण्यातील कोंढवा भागातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद
  • धाराशिवच्या उमरगा शहरात पावसाची जोरदार हजेरी,अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजाराचा उडाला फज्जा

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

चिखली इंधन तुटवडा नियंत्रित

आ. श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकाराने चिखलीत इंधन पुरवठ्यावर प्रशासनाची करडी नजर..

Chikhali fuel shortages: चिखली विधानसभा मतदारसंघात आमदार श्वेता महाले पाटील यांनी इंधन पुरवठ्यावर प्रशासनाला कठोर भूमिका घेतली. तालुक्यात संयुक्त पथके तैनात करण्यात आल्या


आ श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकाराने चिखलीत इंधन पुरवठ्यावर प्रशासनाची करडी नजर

Chikhali fuel shortages |

 

पेट्रोल पंपांवर संयुक्त पथके तैनात; पोलिसांच्या ड्युट्यांमुळे गोंधळाला आळा

चिखली (Chikhali fuel shortages) : पेट्रोल व डिझेल तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी पेट्रोल पंप धारक, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन इंधन पुरवठ्याबाबत कठोर भूमिका घेतली. त्यांच्या सूचनांनुसार तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी २२ मे २०२६ रोजी संपूर्ण चिखली तालुक्यात तत्काळ प्रभावाने लागू होणारे सक्त आदेश जारी केले आहेत.

सध्या समाजमाध्यमे व वृत्तवाहिन्यांमधून पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. त्यामुळे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या व कृत्रिम तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आमदार महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

बुलढाणा हा कृषीप्रधान जिल्हा असल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पाणी पंप व इतर शेतीकामांसाठी डिझेलची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन वापरासाठी पेट्रोलची गरज लक्षात घेता इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने संयुक्त पथके तैनात केली आहेत. आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांच्या पुढाकारानंतर प्रत्येक पेट्रोल पंपावर महसूल व पोलीस प्रशासनाची संयुक्त पथके नियुक्त करण्यात आली असून, इंधन वितरणावर थेट नियंत्रण ठेवले जात आहे. शेतकरी व सामान्य ग्राहकांना प्राधान्याने आणि सुलभतेने इंधन उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आदेश संबंधित पथकांना देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, पेट्रोल पंपांवर गोंधळ, धक्काबुक्की किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांच्या विशेष ड्युट्या लावण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या उपस्थितीमुळे पंपांवरील गोंधळ मोठ्या प्रमाणात कमी झाला असून वाहतूक कोंडी व अनुचित प्रकारांना आळा बसला आहे. त्यामुळे (Chikhali fuel shortages) कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात राहिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच कोणत्याही व्यक्तीला काळाबाजार किंवा साठेबाजीच्या उद्देशाने अतिरिक्त इंधन देऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पेट्रोल पंप चालकांनी ‘नो स्टॉक’चे खोटे फलक लावून कृत्रिम तुटवडा निर्माण करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. एखाद्या पंपावरील इंधनसाठा संपल्यास त्याची माहिती तत्काळ तहसीलदार व पुरवठा विभागाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. संकटकाळात सामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार श्वेता महाले पाटील यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका ही त्यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे उदाहरण असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Related to this topic: