Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

आमदार अमित झनक

लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराची नोंदणी करा: आमदार अमित झनक

MLA Amit Zanak: भारत निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत, रिसोड–मालेगाव विधानसभा मतदारसंघ क्रमांक ३३ साठी अत्यंत महत्त्वाची बी.एल.ए.-२ (बूथ लेव्हल एजंट)


लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराची नोंदणी करा आमदार अमित झनक

MLA Amit Zanak |

 

​रिसोडमध्ये काँग्रेसची ‘बी.एल.ए.-२’ प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न!

रिसोड (MLA Amit Zanak) : भारत निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत, रिसोड–मालेगाव विधानसभा मतदारसंघ क्रमांक ३३ साठी अत्यंत महत्त्वाची बी.एल.ए.-२ (बूथ लेव्हल एजंट) प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. विश्वा लॉन, मालेगाव नाका, रिसोड येथे आयोजित या कार्यशाळेला काँग्रेसचे पदाधिकारी, बूथ प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि महिला पदाधिकाऱ्यांनी प्रचंड संख्येने उपस्थिती लावली होती.

​या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बबनराव सरकटे होते. तर रिसोड–मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. अमित सुभाषराव झनक, ज्येष्ठ नेते दिलीपराव सरनाईक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अक्षय राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

​‘मतदार यादी अचूक करणे’ हेच कार्यकर्त्यांचे मुख्य ध्येय: आमदार अमित झनक
​कार्यशाळेत मार्गदर्शन करताना आमदार अमित झनक म्हणाले की, मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहीम हे लोकशाही अधिक बळकट करण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. या यशस्वी कार्यशाळेचे नेटके आयोजन तालुका काँग्रेस कमिटी, रिसोड यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष रामेश्वर देवकर, शहराध्यक्ष शेख अकबर बागबान यांच्यासह काँग्रेसच्या सर्व आघाडी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

​"बूथ स्तरावरील प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या परिसरातील एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. नवमतदार नोंदणी, नावातील दुरुस्त्या आणि मतदार यादी पूर्णपणे दोषमुक्त व अचूक करण्यासाठी सर्वांनी अत्यंत जबाबदारीने काम करावे."
-आमदार अमित सुभाषराव झनक