Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

आकांशा शेरके आत्महत्या प्रकरण

मानसिक व शारीरिक छळाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या; पती व सासऱ्याविरुद्ध तक्रार

Akansha Sherke Suicide Case:


मानसिक व शारीरिक छळाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या पती व सासऱ्याविरुद्ध तक्रार

Akansha Sherke Suicide Case |

कन्हान (Akansha Sherke Suicide Case) : पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कांद्री येथील एका विवाहितेने सासरी होत असलेल्या कथित मान सिक व शारीरिक छळाला कंटाळुन आत्महत्या केल्या चा आरोप तिच्या आईने केला आहे. याप्रकरणी मृत विवाहितेचा पती गौरव संजय शेरके (वय २६) व सासरे संजय शेरके (वय ५२), रा. पारडी भवानी हॉस्पिटलजवळ, नागपुर यांच्याविरुद्ध कन्हान पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
             
फिर्यादी शालु गोपाल बोबडे रा. हरिहर नगर, कांद्री यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी आकांक्षा (Akansha Sherke Suicide Case) हिचा विवाह १८ एप्रिल २०२६ रोजी गौरव शेरके याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत होते. मात्र त्यानंतर पती व सासऱ्यां कडुन तिला घरातील सर्व कामे करून घेत मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच मारहाण, योग्य आहार न देणे आणि सतत छळ केल्याने तिची प्रकृती खालाव ल्याचेही तक्रारीत नमुद आहे. माहेरी आल्यानंतरही विवाहितेची प्रकृती सुधारली नाही. पुढे पतीला भेटुन घरी परतल्यानंतर ती मानसिक तणावात होती. दि. २५ जुलै रोजी तिने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. तिला तात्काळ कामठी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान आज रविवार (दि.२६) जुलै ला सकाळी ८.४५ वाजता उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. 
               
मृत विवाहितेच्या आईने आपल्या मुलीच्या मृत्युस पती व सासरे जबाबदार असल्याचा आरोप करत दोघांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्या ची मागणी केली आहे. या (Akansha Sherke Suicide Case) प्रकरणी कन्हान थानेदार वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनात कलम १०८, ८५, ३(५) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहेत.