Udgir Cyber Fraud: सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीतून मिळविलेली ₹४ लाख ५७ हजार ६०७ रुपये ६१ पैसे रक्कम उदगीर येथील अॅक्सिस बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील खात्यांमध्ये जमा
४ लाख.५७ हजार रूपये रक्कम संशयिताने दोन बँक खात्यांतून चेकने काढली..
खातेदारांसह अज्ञात सायबर टोळीवर गुन्हा
उदगीर (Udgir Cyber Fraud) : देशभरातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून जमा झालेल्या लाखो रुपयांच्या व्यवहारांचे धागेदोरे थेट उदगीरपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले आहे. सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीतून मिळविलेली ₹४ लाख ५७ हजार ६०७ रुपये ६१ पैसे रक्कम उदगीर येथील अॅक्सिस बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील खात्यांमध्ये जमा करून ती चेकद्वारे काढल्याप्रकरणी उदगीर शहर पोलिसांनी खातेदारांसह अज्ञात सायबर टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या (Udgir Cyber Fraud) प्रकरणी पोलीस अंमलदार गणेश दिगांबर खंदाडे यांच्या फिर्यादीवरून गुरनं. ३१८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून २०२५ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत देशभरातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून मिळालेली रक्कम उदगीरमधील दोन बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली. त्यानंतर संबंधित खातेदार आणि सायबर गुन्हेगारांनी संगनमत करून ही रक्कम चेकच्या माध्यमातून काढल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या (Udgir Cyber Fraud) व्यवहारांमुळे उदगीरचा वापर सायबर फसवणुकीतील 'मनी रूट' म्हणून झाला का, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. संबंधित खातेदार, खाते हाताळणारे, चेकद्वारे पैसे काढणारे तसेच फसवणुकीची रक्कम या खात्यांत जमा करण्यास भाग पाडणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेडेकर करीत असून, या प्रकरणातून सायबर फसवणुकीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.