Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Illegal Murum Mining

जवळा बाजार शिवारातून मुरूम चोरून नेताना टिप्पर पकडला

हट्टा पोलिसांनी राहुल पाटील महाविद्यालयासमोर एका टिप्परला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.


जवळा बाजार शिवारातून मुरूम चोरून नेताना टिप्पर पकडला

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार शिवारातून विनारॉयल्टी मुरुमाचे उत्खनन करून अवैधरित्या चोरून नेत असताना हट्टा पोलिसांनी राहुल पाटील महाविद्यालयासमोर एका टिप्परला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

अनेक ठिकाणी अवैधरित्या रेती व मुरुमाचे उत्खनन होत असल्याने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कारवाई करण्याच्या सूचना महसूल यंत्रणेला दिल्या आहेत. त्यानुसार या यंत्रणेमार्फत अनेक ठिकाणी कारवाईदेखील केली जात आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांनीही जिल्ह्यातील सर्व १३ पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना अवैध रेती व मुरुमाचे उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

११ जुलै रोजी जवळा बाजार शिवारातून टिप्पर क्रमांक एम.एच. ३८ एक्स ८४७० मधून ६ हजार रुपये किमतीचा दोन ब्रास मुरूम विनारॉयल्टी उत्खनन करून अवैधरित्या चोरून नेला जात होता. हट्टा येथील राहुल पाटील महाविद्यालयासमोर पोलिसांनी हा टिप्पर पकडला.

या कारवाईत टिप्परसह मुरूम असा एकूण १० लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हट्टा पोलीस ठाण्यात किशोर कवठेकर यांच्या फिर्यादीवरून भीमानंद सदाशिव काळे, रा. जवळा बाजार, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related to this topic: